Punjab: पार्कच्या भिंतीवर 'खलिस्तान झिंदाबाद' चा नारा, पंजाब पोलिस अलर्ट

पंजाबमधील फरीदकोटमध्ये एका उद्यानाच्या भिंतीवर 'खलिस्तान झिंदाबाद' ( Incidents related to Khalistan in Punjab) पेंट केलेले आढळून आले आहे.
Punjab: पार्कच्या भिंतीवर 'खलिस्तान झिंदाबाद' चा नारा, पंजाब पोलिस अलर्ट
PunjabDainik Gomantak

पंजाबमधील फरीदकोटमध्ये एका उद्यानाच्या भिंतीवर 'खलिस्तान झिंदाबाद' ( Incidents related to Khalistan in Punjab) पेंट केलेले आढळून आले आहे. बाजीगर बस्तीमध्ये हे उद्यान आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तक्रार नोंदवली. (Khalistan Zindabad is inscribed on the wall of a park in Faridkot, Punjab)

या प्रकरणी अधिक माहिती देताना एसएसपी (Punjab Police) म्हणाले, 'आमची टीम तिथे पोहोचली आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. याप्रकरणी टीम काम करत असून एफआयआरही नोंदवण्यात आला आहे. पोलिसांना (Police) सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. तसेच नाका चेक पोस्ट देखील तयार करण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वी मोहाली बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी निशान सिंग याला फरीदकोटमधून अटक करण्यात आल्याचे वृत्त आले होते.

Punjab
Punjab: पटियालामध्ये शिवसैनिक अन् शीख संघटनांमध्ये हाणामारी

दरम्यान, फरीदकोट पोलिसांनी निशान सिंगला अटक केली आहे. पंजाबमधील (Punjab) मोहालीमध्ये पोलिस इंटेलिजन्स विंगच्या मुख्यालयावर रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेडने गोळीबार करण्यात आला. घटनेच्या एका दिवसानंतर, पोलिसांनी हल्ल्यात वापरलेले लाँचर देखील जप्त केले. निशान सिंग हा तरनतारन जिल्ह्यातील कुल्ला गावचा रहिवासी आहे. मोहाली बॉम्बस्फोट प्रकरणातील भूमिकेबाबत त्याची चौकशी करण्यात येणार आहे. त्याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत.

Punjab
Punjab Assembly Election Result 2022 : दिल्लीनंतर आता पंजाब, संपूर्ण देशात इन्कलाब होणार

'लष्कर-ए-खालसा'बाबत इशारा

निशान सिंग याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा एक आणि नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स कायद्यांतर्गत एक गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याच्या अटकेपूर्वी, इंटेलिजन्स ब्युरोने इतर गुप्तचर संस्था आणि राज्य पोलिसांना 'लष्कर-ए-खालसा' गटाच्या स्थापनेबद्दल चेतावणी दिली आहे. 'लष्कर-ए-खालसा' सोशल मीडियावर सक्रिय असून लोकांची भरती करत असल्याचे सांगितले जात आहे. यासोबतच पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयने (ISI) सोशल मीडियावर फेक आकाऊंट्स तयार केली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.