पुडुचेरीच्या नायब राज्यपाल पदावरुन किरण बेदी यांना हटवलं  

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021

पुडुचेरी केंद्रशासीत प्रदेशाच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांना पदावरुन दूर करण्यात आले आहे.

पुडुचेरी केंद्रशासीत प्रदेशाच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांना पदावरुन दूर करण्यात आले आहे. पुडुचेरीच्या सत्तारुढ कॉंग्रेस पक्षामध्ये निर्माण झालेल्या पेचप्रसंगाच्या  पार्श्वभूमीवर त्यांना पदावरुन दूर करण्यात आले असून तेलंगणाचे राज्यपाल टी. सुंदरराजन यांच्याकडे पुडुचेरीची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. पुडुचेरीसाठी नव्या नायब  राज्यपालाची निवड होईपर्यंत टी. सुंदरराजन याच्यांकडेच ही अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे माध्यम सचिव अजयकुमार सिंह यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी आज आसाममधील महाबाहू-ब्रह्मपुत्रा प्रकल्पाचे उद्घाटन करणार

पुडुचेरी केंद्रशासीत प्रदेशाचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे आणि कॉंग्रेसचे आमदार ए.जॉन कुमार यांनी मंगळवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. येणाऱ्य़ा महिन्यात पुडुचेरीमध्ये विधानसभा निवडणूका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर ए. जॉन. कुमार यांनी राजीनामा दिल्यामुळे कॉंग्रेसला पुडुचेरीमध्य़े धक्का बसला आहे. कुमार यांच्या राजीनाम्यामुळे आता सत्तारुढ कॉंग्रेस आणि विरोधकांचे संख्याबळ समान झाले आहे. पुडुचेरी विधानसभेत कॉंग्रेसची सदस्यसंख्या 14 असून विधानसभेची सदस्यसंख्या  28 आहे. कॉग्रेस नेते राहुल गांधी पुडुचेरीच्या दौऱ्यावर येणार आहेत. यापूर्वी तीन आमदारांनी राजीनामा दिला आहे. जॉन कुमार यांनी पुडुचेरी विधानसभा अध्यक्ष व्ही.पी. शिवकोलुंधू यांच्या निवासस्थानी भेट घेवून त्यांच्याकडे राजीनामा दिला.   

संबंधित बातम्या