मंगळवाड येथे किटचे वितरण

Dainik Gomantak
शुक्रवार, 22 मे 2020

तालुका प्रशासनाने तालुक्यातील प्रत्येक पंचायतील ४५ किटचे वितरण केले आहे. 

हल्याळ

हल्याळ येथे राज्यात उद्‌भवणा-या ‘कोविड’ -१९ या महामारी कोरोना विषाणूने थैमान मांडल्याने संकाटात सापडलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारकडून  प्रत्येक मतदारसंघात २५०० किटचे वितरण केले आहे. तालुका प्रशासनाने तालुक्यातील प्रत्येक पंचायतील ४५ किटचे वितरण केले आहे. 

शासनाने दिलेल्या या किट वितरण हल्याळ तालुक्यातील मंगळवाड ग्रामंपचायतील कळसापूर येथील नरेगा उद्याेग खात्री योजनेखाली काम करणा-या कामगारांना हल्याळ तालुका पंचायत सदस्य दयानंद जावळीकर व मंगळवाड पंचायतीचे पी.डी.ओ हिरेमठ आदींनी केले.

यावेळी जावळीकर म्हणाले कोविड-१९ या संसर्गजन्य विषाणूला रोखण्यासाठी आपण सर्वांनीच लढले पाहिजे आणि शासनाला सहकार्य केले पाहिजे. सामाजिक अंतर ठेवा आणि मास्क वापरावे.

संबंधित बातम्या