Kargil Vijay Diwas: कसा रचला पाकिस्तानने कारगिल युद्धाचा नापाक डाव, वाचा सविस्तर

India Pakistan War: 1999 च्या भारत-पाकिस्तान युद्धात भारतीय लष्कराचा विजय इतिहासाच्या पानांवर सुवर्ण अक्षरांनी नोंदला गेला.
Kargil
Kargil Dainik Gomantak

India Pakistan War: 1999 च्या भारत-पाकिस्तान युद्धात भारतीय लष्कराचा विजय इतिहासाच्या पानांवर सुवर्ण अक्षरांनी नोंदवला गेला. 26 जुलैची गोष्ट जेव्हा जेव्हा सांगितली जाते तेव्हा प्रत्येक भारतीय जवानांचे बलिदान आठवतो. आजच्याच दिवशी कारगिलची उंच शिखरे पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यातून मुक्त झाली होती. सुमारे 60 दिवस चाललेल्या या युद्धात पाकिस्तानी घुसखोरांना हुसकावून लावताना भारतीय सैनिकांनी कारगिलच्या या उंच शिखरावर विजयाची पताका फडकवली होती, परंतु कारगिल युद्धाचा नापाक डाव कसा रचला गेला? भारतीय जवानांनी पाकिस्तानी सैन्यांना कशापध्दतीने शह दिला? पाकिस्तानचे मनसुबे कसे उधळले गेले? याविषयी तुम्हाला माहीती आहे का? चला तर मग जाणून घेऊया...

दरम्यान, तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी मैत्रीचा हात पुढे करुन बसने लाहोरला गेले. तेव्हाच दुसरीकडे, पाकिस्तान कारगिल युद्धाचा कट रचत होता. पंतप्रधान अटल बिहारी फेब्रुवारी 1999 मध्ये लाहोरला पोहोचले तेव्हा तिथे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यानंतर 21 फेब्रुवारी 1999 रोजी दोन्ही देशांदरम्यान एक करार झाला, ज्याला 'लाहोर करार' म्हणतात.

Kargil
Kargil Vijay Diwas: ''भारतीय जवानांनी शत्रुवर नेहमीच विजय मिळवला''

दुसरीकडे, या करारानंतर दोन्ही देशांनी संयुक्तपणे सांगितले की, 'आम्ही सहअस्तित्वाच्या मार्गाने पुढे जाऊ. त्याचबरोबर काश्मीरचा प्रश्न चर्चेतून सोडवू.' एकीकडे पाकिस्तान भारताकडे (India) मैत्रीचा हात पुढे करत होता तर दुसरीकडे, त्यांचे सैन्य भारताविरुद्ध कट रचत होते. 'ऑपरेशन बद्र' असे या कटाचे नाव होते.

शिमला कराराचे उल्लंधन करुन षडयंत्र रचले

खरेतर, शिमला करारानंतर असे ठरले होते की, कारगिलमध्ये, जिथे हिवाळ्यात तापमान 30 आणि 40 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येते, तिथे दोन्ही देशांचे सैन्य ऑक्टोबर महिन्यापासून आणि नंतर मे महिन्यात आपल्या चौक्या सोडतील. 1998 मध्ये जेव्हा भारतीय सैन्याने आपल्या चौक्या सोडल्या. तेव्हा 'ऑपरेशन बद्र' अंतर्गत पाकिस्तानी सैन्याने त्यांच्या चौक्या सोडल्याच नाहीत. पाकिस्तानी घुसखोर भारतीय चौक्यांवर कब्जा करुन बसले. या ऑपरेशन अंतर्गत पाकिस्तानी लष्कर श्रीनगर-लेह महामार्ग ताब्यात घेईल, जेणेकरुन पाकिस्तानला (Pakistan) सियाचीन सहज काबीज करता येईल, अशी मुशर्रफ यांची योजना होती.

Kargil
Kargil Vijay Diwas: जम्मू-काश्मीरमध्ये होणार 2000 शहीद जवानांच्या शौर्याचा सन्मान

अशाप्रकारे या नापाक कारस्थानाचा पर्दाफाश झाला

ही गोष्ट 2 मे 1999 ची आहे. ताशी नामग्याल (Tashi Namgyal) नावाचा मेंढपाळ त्याचे याक शोधत होता. त्याचा नवा याक कुठेतरी हरवला होता. याक शोधत तो कारगिलच्या टेकड्यांवर पोहोचला जिथे त्याला पाकिस्तानी घुसखोर दिसले. त्याने दुसऱ्या दिवशी जाऊन भारतीय लष्कराला (Indian Army) याची माहिती दिली. आणि त्यानंतर या युध्दाला सुरुवात झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com