कुंभ मेळा 2021 : हरिद्वारसाठी विशेष रेल्वे गाड्या सुरू

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 14 जानेवारी 2021

आज मकरसंक्रांतीपासून कुंभमेळा सुरू होत आसल्याने भाविकांसाठी विशेष रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत.

हरिद्वार : भारतीय रेल्वे मंत्रालयाने कुंभमेळ्यासाठी विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. आज मकरसंक्रांतीपासून कुंभमेळा सुरू होत आसल्याने भाविकांसाठी विशेष रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत. यावर्षी हरिद्वारमध्ये पार पडणाऱ्या कुंभमेळ्यासाठी रेल्वेस्थानकांचे सुशोभिकरण करण्यात आलं आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंड राज्य आपत्ती प्रतिसाद दलाने (एसडीआरएफ) हरिद्वारमध्ये जनजागृती मोहीम राबविली. एका अधिकृत निवेदनानुसार, एसडीआरएफची आठ पथके 'कुंभ क्षेत्र' मध्ये मोहीमेत 11,000 हून अधिक स्थानिक रहिवासी, भक्तांना मदत करण्यासाठी साठी तैनात करण्यात आली आहेत.     

कुंभ मेळा 2021: विशेष कुंभ गाड्या

  • 02369 हावडा-देहरादून-हावडा सुपर फास्ट स्पेशल 29 एप्रिलपर्यंत धावेल. ट्रेन मंगळवार आणि शुक्रवार चालणार नाही. 
  • 02370 हावडा-देहरादून-हावडा सुपर फास्ट स्पेशल 30 एप्रिलपर्यंत धावेल. ट्रेन देहरादून येथून रात्री 10:10 वाजता सुटेल; बुधवार आणि शनिवारी धावणार नाही.
  • 02327 हावडा-देहरादून-हावडा 12 जानेवारी ते 30 एप्रिल दर मंगळवार आणि शुक्रवार
  • 02328 हावडा-देहरादून-हावडा 13 जानेवारी ते 1 मे दरम्यान देहरादून 10:10 वाजता धावेल- बुधवार आणि शनिवारी
  • 03009/03010 हावडा-योगनगरी ह्रिषिकेश-हावडा (दररोज) 
  • 03009 हावडा-योगनगरी -हावडा 30 एप्रिल पर्यंतधावेल
  • 03010 हावडा-योगनगरीह्रिषिकेश-हावडा 14 जानेवारी ते 2 मे दरम्यान योगनागरी ह्रिषिकेश येथून सायंकाळी 8:50 वाजता धावेल
  • 03239 पटना-कोटा स्पेशल दर सोमवारी व शुक्रवार
  • 03240 कोटा धावेल -पटना स्पेशल 

संबंधित बातम्या