Kumbh Mela 2021: न्यायालयाचा मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांना मोठा झटका!

Kumbh Mela 2021: न्यायालयाचा मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांना मोठा झटका!
Kumbh 2021 In Kumbh Mela the court has given a big blow to Chief Minister Tirath Singh Rawat on corona test

देहरादून: मुख्यमंत्री बनताच कुंभमेळ्याला येणाऱ्या भाविकांसाठी आवश्यक कोविड चाचणी अहवालाचे बंधन मुख्यमंत्री तिरथ यांनी काढून टाकले होते.एक मोठा निर्णय घेत तीरथसिंग रावत यांनी कुंभात येणाऱ्यांसाठी कोरोना नियमांमध्ये सुट दिली होती. मात्र बुधवारी देहरादूनच्या सेक्रेटरींनी कोरोना अहवाल दाखविण्याच्या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहे. विशेष म्हणजे अजूनही कुंभ मेळ्यातील तीन शाही स्नान बाकी आहेत, ज्यात लाखो लोक उपस्थित राहणार आहे.

हल्ली वादात सापडलेले उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंग रावत याच्या निर्णयाला निषेध करत उत्तराखंड उच्च न्यायालयाने पुन्हा कुंभात सामील होण्यासाठी कोरोना चाचणीचा नकारात्मक अहवाल आणणे बंधनकारक केले आहे.  कोर्टाने म्हटले आहे की, राज्यातील बिघडलेली कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता कुंभमध्ये सामील होणाऱ्या लोकांना आरटीपीसीआरचा नकारात्मक अहवाल आणणे अनिवार्य असणार आहे. याशिवाय कुंभमेळात येणाऱ्या भक्तांना कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखवणे अनिवार्य आहे. केंद्राने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. सर्व अभ्यागतांसाठी कोरोना चाचणी अहवालाचा नकारात्मक अहवाल आणणे बंधनकारक आहे आणि ते सर्वांच्याच हिताचे आहे. असे हायकोर्टाने सांगितले आहे.

स्वतः तीरथसिंग रावत यांना संसर्ग झाला

उत्तराखंडचे सीएम तीरथसिंग रावत यांना कोरोना झाला आहे. त्यामुळे त्यांच्या सोबत प्रोग्राममध्ये सामील असलेल्या बर्‍याच लोकांना अलिप्त ठेवण्यात आले आहे आणि त्यांची चाचणी घेण्यात येत आहे. राज्यात कोरोना प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर केंद्र सरकारनेही चिंता व्यक्त केली होती, त्यानंतर लसीकरण आणि तपासणीचा वेग राज्यात वाढविण्यात आला आहे. राज्यात दररोज पाच हजार आरटीपीसीआर चाचण्या घेतल्या जात आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com