पुढील वर्षी कुंभमेळा साडेतीन महिन्यांऐवजी ४८ दिवसांचा

PTI
सोमवार, 28 डिसेंबर 2020

उत्तराखंडमध्ये हरिद्वार येथे पुढील वर्षी साडेतीन महिन्यांऐवेजी ४८ दिवसांसाठी कुंभमेळा होईल, अशी माहिती राज्याचे नागरी विकास मंत्री मदन कौशिक यांनी दिली.

हरिद्वार : उत्तराखंडमध्ये हरिद्वार येथे पुढील वर्षी साडेतीन महिन्यांऐवेजी ४८ दिवसांसाठी कुंभमेळा होईल, अशी माहिती राज्याचे नागरी विकास मंत्री मदन कौशिक यांनी दिली. यासंदर्भाती अधिसूचना राज्य सरकार १ जानेवारीऐवजी फेब्रुवारीत जारी करेल, असेही त्यांनी सांगितले. कौशिक म्हणाले, की कोरोनाची साथ लक्षात घेऊन शाही स्नानासाठी मार्च-एप्रिलमध्ये सुविधा केली जाईल. भाविकांना कुंभमेळ्याच्या ४८ दिवसांत शाही स्नानाच्या पर्वणीचा आनंद घेता येईल. कुंभमेळ्यासाठी प्रशासनाने अद्याप कोणत्याही तयारीला सुरवात केली नसल्याबद्दल अखिल भारतीय आखाडा परिषदेने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर, दुसऱ्याच दिवशी कौशिक यांनी कुंभमेळ्याबद्दल ही माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी पाळत ठेवण्याच्या यंत्रणेसाठी १७.३४ कोटींचा निधी मंजूर केला असून त्यापैकी ६.९४ कोटींचा पहिला हप्ता दिला जाईल.

"अनेक वर्षांपासून साडेतीन महिन्यांसाठी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. मात्र, यंदा बदललेल्या परिस्थितीमुळे दीड महिन्यांसाइच कुंभमेळा होईल. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत चयांनी कुंभमेळ्याच्या विविध प्रकल्पांसाठी निधी मंजूर केला आहे."
- मदन कौशिक,
नागरी विकास मंत्री, उत्तराखंड.

कुंभमेळ्याचा निर्णय आखाडा परिषदेचा

कुंभमेळ्यासाठी सरकारने सहकार्य न केल्यास स्वत: कुंभमेळा भरविण्याचा निर्णय अखिल भारतीय आखाडा परिषदेने घेतला. परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी म्हणाले, की आम्ही यासंदर्भात मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांना निवेदन पाठवले आहे. 

संबंधित बातम्या