'एक राष्ट्र एक शिधापत्रिका' योजनेत लडाख आणि लक्षद्वीप यांचा समावेश

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

दोन्ही केंद्रशासित प्रदेशांनी राष्ट्रीय क्लस्टरमध्ये इतर राज्ये / केंद्रशासित प्रदेशांबरोबर  राष्ट्रीय पोर्टेबिलिटी व्यवहारांची चाचणी आणि तपासणी  पूर्ण केली आहे.

नवी दिल्ली: ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी काही दिवसांपूर्वी “एक राष्ट्र एक शिधापत्रिका” योजनेच्या अंमलबजावणीच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि लडाख व लक्षद्वीप या दोन केंद्रशासित प्रदेशांच्या आवश्यक तांत्रिक सज्जतेची दखल घेत विद्यमान २४ राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या राष्ट्रीय पोर्टेबिलिटी क्लस्टरसह या दोन केंद्रशासित प्रदेशांच्या एकत्रिकरणाला मंजुरी दिली.

दोन्ही केंद्रशासित प्रदेशांनी राष्ट्रीय क्लस्टरमध्ये इतर राज्ये / केंद्रशासित प्रदेशांबरोबर  राष्ट्रीय पोर्टेबिलिटी व्यवहारांची चाचणी आणि तपासणी  पूर्ण केली आहे. याबरोबरच आता एकूण २६ राज्ये/केंद्रशासित प्रदेश एक राष्ट्र एक शिधापत्रिका योजनेंतर्गत एकमेकांशी अखंडपणे जोडले आहेत.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या