जिथे सांडले होते रक्त तिथेच आज रंगली होळी!

दैनिक गोमन्तक
सोमवार, 29 मार्च 2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीसह देशभरात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीसह देशभरात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत सर्वत्र रंगांची धूळधाण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानंतर पांढर्‍या बर्फाने झाकलेले लडाख मधील पर्वत देखील वेगवेगळ्या रंगाने न्हाऊन निघाल्याचे आज दिसले. कारण चीन सोबत संघर्ष झालेल्या लडाख मधील गलवान भागात भारतीय सैनिकांनी होळीचा सण साजरा केला. आणि त्यामुळेच येथील होळी ही संपूर्ण देशभरासाठी नवीन उमंग देणारी ठरली आहे. 

आयटीबीपीच्या जवानांनी 17 हजार फूट उंचीवर असलेल्या गलवान सरोवराजवळ जोरदार होळी खेळली. यावेळी जवानांनी एकमेकांना रंगचं लावला नाही तर  जोरदार डान्स देखील केला. तसेच चीनला मात दिल्याचा उत्साह देखील जवानांच्या चेहऱ्यावर झळकत असल्याचे यावेळी दिसले. याशिवाय आयटीबीपीचे जवान सपना चौधरी यांच्या गाण्यांवर थिरकताना पाहायला मिळाले. 

काश्मीरच्या सोपोरमध्ये कौन्सलरवर दहशतवादी हल्ला; कौन्सलर आणि एक सैनिक शहीद

दरम्यान, मागील वर्षाच्या मे महिन्यात भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये सीमारेषेवरून जोरदार वाद उफाळला होता. त्यानंतर जून महिन्याच्या मध्यास दोन्ही देशांचे सैनिक आमने-सामने येत जोरदार संघर्ष झाला होता. आणि या संघर्षात भारतीय सैन्यातील 20 जवान शहीद झाले होते. तर चीनला देखील नुकसान झेलावे लागले होते.    

संबंधित बातम्या