Video आपल्या बाळाला कुशीवर घेऊन काम करत तिने आई आणि पोलिस ही दोन्ही कर्तव्ये समर्थपणे निभावली

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 7 मार्च 2021

8 मार्च रोजी संपूर्ण जग आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करतो. देश, जात, भाषा, राजकीय आणि सांस्कृतिक भेदभाव न करता जगभरातील महिला एकत्रितपणे हा दिवस साजरा करतात.

नवी दिल्ली : 8 मार्च रोजी संपूर्ण जग आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करतो. देश, जात, भाषा, राजकीय आणि सांस्कृतिक भेदभाव न करता जगभरातील महिला एकत्रितपणे हा दिवस साजरा करतात. महिला दिनाच्या फक्त दोन दिवस आधी चंदीगढमधून एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्याचे ट्विटरवर खूप कौतुक होत आहे. या व्हिडिओमध्ये, वाहतूक पोलिस विभागाची एक महिला कर्मचारी तिच्या मुलाला कुशीवर घेऊन ट्राफिक सांभाळत आहे. 

West Bengal Election:  ममता बॅनर्जीं विरुध्द सुवेंदू अधिकारी

हा व्हिडिओ यूपीचे पोलिस कॉन्स्टेबल सचिन कौशिक यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, 'मातृत्व आणि कर्तव्याचा संगम'. शुक्रवारी चंदीगढमधील एका  ट्रफिक पोलिस महिलेने आपल्या मुलाला सांभाळत असतानाच, चौकातलं ट्राफिक सांभाळण्याची तारेवरची कसरत केली. आपलं बाळ कुशीत असतानादेखील तिने कर्तव्य बजावल्याचा व्हिडिओ शुक्रवारी व्हायरल झाला आहे. प्रियंका नावाच्या एक महिला ट्राफिक पोलिस आपल्या बाळाला घेऊन ड्युटीवर आल्या होत्या.

''फोटो छापण्याच्या शर्यतीत मोदीजी अग्रेसर''

स्थानिकांनी या दृश्यांचे चित्रिकरण करून सोशल मीडियावर टाकताच, हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत, त्यावर लाखो लाईक्स आणि कमेंट्स आल्या. अनेकांनी त्या ट्राफिक पोलिस महिलेने आपल्या कामाप्रती दाखवलेल्या समर्पणाचं कौतुक करतानाच, महिलांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामोरं जावं लागणाऱ्या अडथळ्यांवरदेखील प्रकाश टाकला. 

संबंधित बातम्या