Lakhimpur Kheri Case: काँग्रेस शिष्टमंडळ राष्ट्रपतींच्या भेटीला, मिश्रांच्या राजीनाम्याची मागणी

राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाच्या दोन विद्यमान न्यायाधीशांचे एक आयोग स्थापन करावे अशी मागणी काँगेसने (Congress) केली आहे.
Lakhimpur Kheri Case: काँग्रेस शिष्टमंडळ राष्ट्रपतींच्या भेटीला, मिश्रांच्या राजीनाम्याची मागणी
Lakhimpur Kheri Case: Congress delegation met President Ram Nath KovindTwitter @ANI

काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या शिष्टमंडळाने (Congress delegation) आज लखीमपूर खेरी हिंसा (Lakhimpur Kheri Case) प्रकरणी राष्ट्रपती राम नाथ कोविंद (resident Ram Nath Kovind) यांची भेट घेतली आणि अजय कुमार मिश्रा (Ajay Mishra) यांना केंद्रीय गृह राज्यमंत्रिपदावरून काढून टाकण्याची विनंती देखील काँग्रेस शिष्टमंडळाने केली जेणेकरून हा तपस निपक्षपातीपणे होईल आणि न्याय मिळू शकेल. राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाच्या दोन विद्यमान न्यायाधीशांचे एक आयोग स्थापन करावे आणि राष्ट्रपतींनी यासंदर्भात सरकारला निर्देश द्यावेत.अशी मागणी देखील काँगेसने केली आहे. (Lakhimpur Kheri Case: Congress delegation met President Ram Nath Kovind)

राहुल गांधी व्यतिरिक्त काँग्रेसच्या शिष्टमंडळात राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, ज्येष्ठ नेते एके अँटनी, गुलाम नबी आझाद आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांचा समावेश होता. पक्षाच्या शिष्टमंडळाने या संदर्भात राष्ट्रपतींना निवेदनही दिले आहे.

राष्ट्रपतीच्या भेटीनंतर , 'ज्या कुटुंबांचे सदस्य मृत्यू पावले आहेत त्या कुटुंबांनी न्याय हवा असल्याचे सांगितले आहे. ज्या व्यक्तीने ही हत्या केली त्याला शिक्षा झाली पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे. ज्या व्यक्तीने खून केला त्याचे वडील देशाचे गृह राज्यमंत्री आहेत आणि जोपर्यंत ती व्यक्ती मंत्री आहे तोपर्यंत योग्य तपास होऊ शकत नाही..' अशी भावना राहुल गांधी यांनी वय,व्यक्त केली आहे.

तत्पूवी अजय मिश्रा यांनी शेतकऱ्यांना धमकी दिल्याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता त्याच व्हिडिओचा संदर्भ देत त्यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेस करत आहे.

Lakhimpur Kheri Case: Congress  delegation met President Ram Nath Kovind
लखीमपूर खेरी प्रकरणाचा निषेध करत अर्थमंत्र्यांनी विरोधकांवर साधला निशाणा

तसेच काँगेस नेत्या प्रियंका गांधी म्हणाल्या, 'शहीद शेतकरी आणि पत्रकार रमेश कश्यप यांच्या कुटुंबीयांना न्याय हवा आहे. सध्याच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी झाली पाहिजे. त्यांचा असा विश्वास आहे की मंत्री बरखास्त केल्याशिवाय योग्य तपास होऊ शकत नाही. ही फक्त शहीद शेतकऱ्यांची मागणी नाही, तर उत्तर प्रदेशातील सर्व लोकांची आणि योग्य विचारसरणीच्या प्रत्येक व्यक्तीची मागणी आहे.'

काँग्रेसने 10 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपतींना पत्र लिहून पक्षाच्या 7 सदस्यीय शिष्टमंडळाला राष्ट्रपतींना भेटण्यासाठी भेटीची मागणी केली होती. त्यानंतर ही विनंती राष्ट्रपतींनी मंगळवारी मंजूर केली. लखीमपूर खेरी घटनेवरून केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांना बडतर्फ करण्याची मागणी काँग्रेस करत आहे.

3 ऑक्टोबर रोजी लखीमपूर खेरी जिल्ह्याच्या तिकोनिया भागात झालेल्या हिंसाचारात 4 शेतकऱ्यांसह 8 लोकांचा मृत्यू झाला होता, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या मूळ गावी भेटीच्या विरोधात शेतकरी आक्रमक झाले असतानाच ही हिंसा घडली होती या प्रकरणी मिश्रा यांचा मुलगा आशिषसह अनेक लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आशिष मिश्रासह 3 जणांना अटक देखील करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.