Lakhimpur Kheri violence: सरकार शेतकऱ्यांवर आक्रमण करतंय, राहुल गांधींचा घणाघात

उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खैरी भागात झालेल्या हिंसाचारांनंतर (Lakhimpur Kheri violence) सरकारविरोधात राहुल गांधी (Rahul Gandhi) आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत.
Lakhimpur Kheri violence: Rahul Gandhi Attacks on Modi government
Lakhimpur Kheri violence: Rahul Gandhi Attacks on Modi governmentDainik Gomantak

उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खैरी भागात झालेल्या हिंसाचारांनंतर (Lakhimpur Kheri violence) सरकारविरोधात राहुल गांधी (Rahul Gandhi) आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. ते आज या भागाला भेटही देणार आहेत मात्र लखीमपूर खैरी भागात कलम 144 लागू असल्याने ते जाऊ शकतील का हा प्रश्न आहे मात्र तत्पूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. (Lakhimpur Kheri violence: Rahul Gandhi Attacks on Modi government)

सरकार शेतकऱ्यांवर फक्त अन्याय करत आहे असा आरोप करत राहुल गांधी यांनी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. शेतकऱ्यांवर नियोजितरित्या आक्रमण होत आहे. शेतकऱ्यांचं जे आहे ते त्यांच्याकडून हिसकावलं जात हे दुर्भाग्य आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशमध्ये असूनही ते लखीमपूरला गेले नाहीत. आज मी दोन मुख्यमंत्र्यांसोबत जाणार आहे.मला खरी परिस्थिती जाणून घ्यायची असेल तर मला तिथे जाणे गरजेचं आहे असे सांगत त्यांनी लखीमपूर खैरी भागात जाणारच असेही सांगतिले आहे.

आम्ही उत्तर प्रदेश मध्ये का जाऊ शकत नाही असा सवालही त्यांनी सरकारला विचारला आहे. भारतीयांच्या आवाजाला सरकार दाबत आसून मात्र आम्ही आवाज उठवणारच असा इशारा देखील राहुल गांधी यांनी दिला आहे.

Lakhimpur Kheri violence: Rahul Gandhi Attacks on Modi government
Lakhimpur Kheri violence:मोदीजी तुमची नैतिकता कुठे गेली?,प्रियंका गांधींचा पंतप्रधानांना संतप्त सवाल

सरकारला मी सांगू इच्छितो की विरोधी पक्षांचे काम आम्ही चोख करत आहोत आणि जेणे करून सरकार कारवाई करेल. याअगोदर घडलेल्या हाथरस प्रकरणातही आम्ही दबाव आणला होता आणि मगच कारवाई झाली. आणि आताही सरकार टाच करत आहे. पण आम्ही सत्य समोर आणणारच असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com