Lakhimpur Violence: आशिष मिश्राला दिलासा, SC कडून अंतरिम जामीन मंजूर; मात्र या अटी...!

Ashish Mishra Teni: अंतरिम जामिनावर सुटल्यानंतर आठवडाभरात त्यांना यूपी सोडावे लागेल, असे न्यायालयाने म्हटले आहे.
Ashish Mishra gets Interim Bail
Ashish Mishra gets Interim BailDainik Gomantak

Ashish Mishra Gets Interim Bail: लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप असलेल्या आशिष मिश्रा यांना सर्वोच्च न्यायालयाने 8 आठवड्यांसाठी सशर्त अंतरिम जामीन मंजूर केला आहे. अंतरिम जामिनावर सुटल्यानंतर आठवडाभरात त्यांना यूपी सोडावे लागेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. आठ आठवड्यांच्या कालावधीत ते दिल्ली किंवा उत्तर प्रदेशात राहणार नाहीत. तसेच, त्यांना त्यांचा पासपोर्ट सरेंडर करावा लागेल.

त्याचबरोबर यूपीमध्ये फक्त ट्रायल कोर्टाच्या सुनावणीसाठी हजर रहावे लागेल. जामीन कालावधीत आशिष मिश्रा जिथे राहतील, तिथे त्यांना संबंधित पोलिस ठाण्यात हजर राहावे लागेल, असेही न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणी विशेष अधिकार वापरुन न्यायालयाने चार आरोपींना (Accused) जामीनही मंजूर केला आहे.

Ashish Mishra gets Interim Bail
Lakhimpur Kheri violence: सरकार नेमकं काय लपवतंय?, केजरीवालांचा सवाल

तसेच, आशिष मिश्रा किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडून साक्षीदारांना धमकावण्याचा प्रयत्न होत असेल, तर जामीन फेटाळण्यासाठी ते योग्य कारण असेल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. आशिष मिश्रा यांना ट्रायल कोर्टाच्या सुनावणीला हजर राहावे लागेल आणि जर त्यांच्याकडून खटला लांबवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला असेल, तर जामीन फेटाळला जाऊ शकतो.

Ashish Mishra gets Interim Bail
Lakhimpur Kheri Violence: सरकारने लोकशाहीचा खून केलाय, शरद पवारांचा घणाघात

आठ आठवड्यांनंतर एससी पुन्हा पुनरावलोकन करेल

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ट्रायल कोर्टाला साक्षीदारांच्या साक्षीबाबत स्टेटस रिपोर्ट पाठवण्यास सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयात 14 मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे. त्यानंतर जामीन कालावधी वाढवता येईल की, नाही याचा आढावा सर्वोच्च न्यायालय घेईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com