पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली दखल

ललितपूर येथील बलात्काराच्या घटनेवरून पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. NHRCने 4 आठवड्यांत मागितले उत्तर
पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली दखल
Lalitpur Rape CaseDainik Gomantak

ललितपूरमधील बलात्काराच्या घटनेनंतर (Lalitpur Rape Case) पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेनंतर विरोधकांकडूनही सरकारवर सातत्याने हल्लाबोल सुरू आहे. आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (National Human Rights Commission of India) या प्रकरणाची दखल घेतली आहे. या प्रकरणाच्या अहवालावर आयोगाने चार आठवड्यांत उत्तर मागितले आहे.

Lalitpur Rape Case
UN World Food प्रोग्राम शिष्टमंडळाने अमृतसरला दिली भेट

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने(NHRC) स्वतः ललितपूर येथील बलात्कार प्रकरणाची दखल घेत चार आठवड्यांत अहवाल मागवला आहे . आयोगाने या प्रकरणी मुख्य सचिव आणि यूपीच्या पोलीस महासंचालकांना नोटीस बजावली आहे. दुसरीकडे, पाली पोलीस ठाण्याच्या फरार निरीक्षकाला अटक करण्यात आली आहे. याबाबत माहिती देताना प्रयागराज रेंजचे एडीजी प्रेम प्रकाश म्हणाले की, आम्हाला सकाळी माहिती मिळाली होती. एडीजी कानपूर झोन यांनी ही माहिती दिली. एक आरोपी इन्स्पेक्टर असून, त्याच्यावर कलम 376 नुसार गुन्हा दाखल आहे. प्रयागराजमध्ये त्याचे स्थान शोधले जात आहे. त्यांनी त्यांची एक टीमही पाठवली होती, आम्ही स्थानिकांच्या मदतीने अटक करण्यात मदत केली.

Lalitpur Rape Case
कोवोव्हॅक्स कोविड-19 लस 12 वर्षांवरील प्रत्येकासाठी उपलब्ध: अदार पूनावाला

काय आहे प्रकरण

यूपीच्या ललितपूरमध्ये पोलिसांनी घृणास्पद घटना घडवून आणली आहे. ललितपूरमधील पाली येथील अल्पवयीन मुलगी बलात्काराची शिकार झाली होती. तिच्यावर झालेल्या अत्याचाराची तक्रार करण्यासाठी ती पोलीस ठाण्यात पोहोचली असता पोलीस अधिकाऱ्याने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. तर यापूर्वी परिसरातील तीन मुलांनी अल्पवयीन मुलीला फूस लावून २२ एप्रिल रोजी भोपाळला नेले होते. तेथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला आणि नंतर मुलीला घरी सोडण्यात आले होते. आता याच प्रकरणाची दखल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली आहे. हे प्रकरण खूप गंभीर असल्याने आयोगाने त्वरीत या घटनेसंबधी संपुर्ण रेकॉर्ड मागवला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.