बिहारमध्ये ‘एनडीए’च्या आमदारांना लालूंचे मंत्रिपदाचे आमिष

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपच्या आमदारांनी पक्षाच्या उमेदवाराविरोधात मतदान केले तर मंत्रिपद देण्याचे प्रलोभन तुरुंगात असलेले राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी केल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी बुधवारी केला. 

पाटणा :  बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपच्या आमदारांनी पक्षाच्या उमेदवाराविरोधात मतदान केले तर मंत्रिपद देण्याचे प्रलोभन तुरुंगात असलेले राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी केल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी बुधवारी केला. 

याप्रकरणी लालू प्रसाद यादव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)च्या आमदारांनी केली आहे. मोदी यांनी काल रात्री उशिरा केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की त्यांनी लालू यादव यांना दूरध्वनी करून भाजपच्या आमदारांना स्वतःच्या पक्षात ओढून नितीश कुमार यांचे सरकार पाडण्याचा डाव न खेळण्याचा सल्ला दिला. दूरध्वनी स्वतः लालूंनीच घेतला होता. रांची कारागृहात शिक्षा भोगत असलेले लालू प्रसाद यादव हे ‘एनडीए’च्या आमदारांना सतत फोन करून मंत्री बनविण्याचे प्रलोभन देत आहेत. तसेच काही आमदारांना भीतीही दाखवीत आहेत, असा आरोप मोदींनी केला. 

अधिक वाचा :

चेन्नईत पावसाचा धुमाकूळ ; आज सार्वजनिक वाहतूकीवर बंदी

विविध कामगार संघटना, बॅंकांचा आज देशव्यापी संप ; शेतकरी संघटनांची ‘दिल्ली-चलो’ची हाक

संबंधित बातम्या