लालू प्रसाद यादव यांची प्रकृती खालावली; दिल्लीच्या एम्स मध्ये केले शिफ्ट   

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 24 जानेवारी 2021

राजद पक्षाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांची प्रकृती ढासळल्याची माहिती मिळाली आहे. चारा घोटाळ्यासह अन्य चार घोटाळ्यांच्या प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या लालू प्रसाद यादव यांना काल दिल्लीतील अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान (एम्स) हॉस्पिटल मध्ये हलविण्यात आल्याचे समजते.

राजद पक्षाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांची प्रकृती ढासळल्याची माहिती मिळाली आहे. चारा घोटाळ्यासह अन्य चार घोटाळ्यांच्या प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या लालू प्रसाद यादव यांना काल दिल्लीतील अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान (एम्स) हॉस्पिटल मध्ये हलविण्यात आल्याचे समजते. लालू प्रसाद यादव यांची प्रकृती अधिक गंभीर झाल्याने त्यांना एअर ऍम्ब्युलन्सने दिल्लीला हलविण्यात आले आहे.  

लालू प्रसाद यादव यांना एम्स मध्ये दाखल केल्यानंतर कार्डिओथोरॅसिक सेंटरच्या कोरोनरी केअर युनिटमध्ये (सीसीयू) ठेवण्यात आले असल्याचे एम्स कडून सांगण्यात आले आहे. याशिवाय बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री राहिलेले लालू प्रसाद यादव यांच्या आरोग्यावरील देखरेखीसाठी एम्सने डॉक्टरांची एक टीम तयार केली आहे. तसेच एम्सच्या कार्डिओलॉजी विभागाचे प्रोफेसर राकेश यादव हे देखील लालू प्रसाद यादव यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती मिळाली आहे. 

लालू प्रसाद यादव यांच्यासह त्यांची मोठी मुलगी आणि राज्यसभेच्या खासदार मीसा भारती या एम्स मध्ये आहेत. तर काल रात्री राबड़ी देवी आणि तेजस्वी यादव हे एम्स मध्ये लालू प्रसाद यादव यांच्यासोबत होते. मागील काही दिवसांपासून लालू प्रसाद यादव यांची तब्येत बिघडली आहे. लालू प्रसाद यादव यांच्या फुफ्फुसात पाणी जमा झाले असून, त्यांना न्यूमोनियाचा संसर्ग देखील झाला आहे. याशिवाय डायबेटीसच्या कारणामुळे त्यांची किडनी केवळ 25 टक्केच काम करत असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे रांची येथील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (रिम्स) येथे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते.       

संबंधित बातम्या