राजद नेते लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृती खालावली

गोमंतक ऑनलाईन टीम
शनिवार, 12 डिसेंबर 2020

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. त्यांच्या किडनीला दुखापत झाली असल्याची माहिती त्यांचे डॉक्टर उमेश प्रसाद यांनी आज दिली आहे.​

रांची- राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. त्यांच्या किडनीला दुखापत झाली असल्याची माहिती त्यांचे डॉक्टर उमेश प्रसाद यांनी आज दिली आहे. लालू प्रसाद यांचे किडनी फंक्शन कधी बिघडेल ते सांगता येत नसल्याचे डॉ. उमेश यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यांची प्रकृती ठीक नसून आम्ही तुरूंग अधिकाऱ्यांना तसे लेखी निवेदन दिले आहे, असेही उमेश यांनी यावेळी सांगितले. 

दरम्यान, लालू प्रसाद यादव हे चारा घोटाळ्याप्रकरणी तुरूंगात शिक्षा भोगत असून त्यांची प्रकृती बिघडल्याने रांचीमधील राजेंद्र इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसेस येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या किडनीतील क्रिअॅटीनीन स्तर वाढतच जात आहे. त्यांच्या किडनीची कार्यक्षमता 25 टक्के इतकीच राहिल्याने त्यांना पुढील काळात डायलिसिसाठी दाखल करावे लागेल, असे डॉ. उमेश यांनी सांगितले.     
 

संबंधित बातम्या