Lalu Prasad Yadav: 'अमित शहा पूर्णपणे वेडे झाले...,' लालू यादवांचा घणाघात

Bihar Politics: बिहारच्या राजकारणावरुन भाजप आणि आरजेडीमधील शाब्दिक युद्ध तीव्र झाले आहे.
Lalu Prasad Yadav
Lalu Prasad YadavDainik Gomantak

Lalu Prasad Yadav Targets Amit Shah: बिहारच्या राजकारणावरुन भाजप आणि आरजेडीमधील शाब्दिक युद्ध तीव्र झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच नितीश कुमार यांनी भाजपसोबतची युती तोडल्याबद्दल हल्लाबोल केला. यातच आता आरजेडी अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी अमित शहा यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. ते शनिवारी म्हणाले की, 'अमित शहा पूर्णपणे वेडे झाले आहेत.' त्याच बरोबर, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या भेटीच्या एक दिवस आधी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह आरजेडी प्रमुखांनी विरोधी ऐक्याच्या गरजेवर भर दिला.

लालू प्रसाद यादव यांचा अमित शहांवर हल्लाबोल

लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) पुढे म्हणाले की, 'अमित शहा (Amit Shah) पूर्णपणे वेडे झाले आहेत. बिहारमध्ये आता त्यांची सत्ता राहीली नाही. 2024 मध्येही भाजपला पराभवाला सामोरे जावे लागेल. म्हणून ते आता बिहारमध्ये (Bihar) पुन्हा 'जंगलराज' येईल हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. गुजरातमध्ये असताना त्यांनी काय केले?'

Lalu Prasad Yadav
Lalu Prasad Yadav उपचारासाठी सिंगापूरला जाणार, पासपोर्ट जारी करण्याचे कोर्टाचे आदेश

मोठा आरोप केला

ते (अमित शाह) गुजरातमध्ये असताना जंगलराज होते, असा आरोप बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, अमित शहा पूर्णपणे वेडे झाले आहेत. 2024 मध्ये केंद्रात आणि त्यानंतर पुढच्या वर्षी बिहारमध्ये भाजप पुन्हा सरकार स्थापन करेल या गृहमंत्र्यांच्या दाव्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, 'ते आम्ही पाहू.'

सोनिया गांधी यांची भेट घेणार

नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव रविवारी संध्याकाळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची भेट घेण्याची शक्यता आहे. प्रकृती अस्वास्थ्याने त्रस्त असलेले लालू प्रसाद यादव म्हणाले की, 'आम्ही विरोधी एकजुटीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. हाच आमच्या बैठकीचा अजेंडा असेल.'

Lalu Prasad Yadav
Lalu Yadav News: पंतप्रधान मोदींनी केली लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीची विचारपूस

शहांनी नितीशकुमारांवर निशाणा साधला होता

बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री भाजपच्या पाठीत खंजीर खुपसत आहेत. काँग्रेस आणि आरजेडीबरोबर जाऊन पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा ते पूर्ण करत आहेत, असा आरोप करत शाहांनी शुक्रवारी नितीशकुमार यांच्यावर टीका केली. पूर्णिया येथे आयोजित सभेत शाह म्हणाले होते की, '2024 च्या लोकसभा निवडणुकीत नितीश कुमार आणि आरजेडी अध्यक्ष लालू प्रसाद यांच्या जोडीचा सफाया होईल. त्याचबरोबर, एक वर्षानंतर, राज्य विधानसभा निवडणुकीत भाजप स्वबळावर बहुमत मिळवेल. जनतेला महाआघाडीचे 'जंगलराज' नको आहे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com