युपी गेटवर मोठ्या प्रमाणात पोलीस दाखल; आंदोलनकर्त्यांना घटनास्थळ खाली करण्याचे आदेश 

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 28 जानेवारी 2021

नवीन कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमारेषेवर आंदोलन करत असलेल्या शेतकर्‍यांना हटविण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. कारण गाझियाबाद जिल्हा प्रशासनाने युपी गेटवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना जागा खाली करण्यासाठीचे आदेश दिले आहेत.

नवीन कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमारेषेवर आंदोलन करत असलेल्या शेतकर्‍यांना हटविण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. कारण गाझियाबाद जिल्हा प्रशासनाने युपी गेटवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना जागा खाली करण्यासाठीचे आदेश दिले आहेत. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार आज रात्रीपर्यंत उत्तर प्रदेशच्या सीमारेषेवरील युपी गेट येथील आंदोलनाची जागा रिकामी करण्यात येऊ शकते. तर डीएम अजय शंकर पांडे यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. याशिवाय राकेश टिकैत यांनी आंदोलनाची जागा खाली करण्यासाठी एका तासाचा अवधी पोलिसांकडे मागितला असल्याची माहिती मिळाली आहे. 

गोवा सरकारच अडकले चक्रव्‍युहात

याव्यतिरिक्त, मेरठ रेंजमधून मोठ्या प्रमाणावर पोलीस युपी गेटवर दाखल झाले असल्याचे समजते. त्याच वेळी, यूपीचे अतिरिक्त पोलीस अधिकारी प्रशांत कुमार यांनी दिल्लीत घडलेल्या घटनेनंतर काही शेतकरी संघटनांनी चिल्ला बॉर्डर व अन्य ठिकाणाहून आंदोलन मागे घेतल्याची माहिती दिली. तसेच बागपतमधील काही आंदोलनकर्त्यांना समजावून सांगितल्यानंतर त्यांनी देखील आंदोलन स्थगित केले आहे. आणि यूपीच्या गेटवर अजूनही काही आंदोलनकर्ते   आहेत, परंतु त्यांची संख्या बरीच कमी झाल्याचे प्रशांत कुमार यांनी सांगितले. 

त्यानंतर, भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांची चौकशी करण्यासाठी गाझीपूर पोलिस ठाण्याचे अधिकारी यूपी गेटवर पोहोचले आहेत. तर, दिल्ली पोलिसही सक्रीय झाले असून, त्यांनी राकेश टिकैत यांना घटनास्थळी लावलेल्या टेंट प्रकरणी नोटीस बजावली आहे. तसेच, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ट्रॅक्टर परेड मध्ये झालेल्या हिंसक घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी शेतकरी नेते जगतरसिंग बाजवा यांना काल नोटीस पाठवत तीन दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे. या नोटीस मध्ये दिल्ली पोलिसांनी दिल्लीतील घडलेल्या हिंसेप्रकरणी त्यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई का करू नये, असे विचारण्यात आले आहे. 

दरम्यान, मंगळवारी प्रजासत्ताक दिनादिवशी आयोजित करण्यात आलेल्या ट्रॅक्टर परेडमध्ये हिंसा झाल्याने पोलिस प्रशासनाने कठोर धोरण स्वीकारत, बुधवारी रात्री आंदोलनाच्या जागेची वीज खंडित केली होती. मात्र त्यानंतर पुन्हा रात्री वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला होता. तसेच, आज पाणीपुरवठा देखील होऊ शकला नाही. नगरपालिकेचे टँकर व बहुतेक शौचालयही येथून हटविण्यात आले आहेत.  

संबंधित बातम्या