Jammu And Kashmir: 'आई-वडिलांचा आवाज कानावर पडताच दहशतवाद्यांनी...', पाहा व्हिडिओ

जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे.
Security Forces
Security ForcesDainik Gomantak

Lashkar Militants Surrender: जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. दक्षिण काश्मीरमधील कुलगाममध्ये थेट चकमकीदरम्यान, दोन दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. ज्यांना अलीकडेच लष्कर फ्रंट-टीआरएफ गटात भरती करण्यात आले होते. हे दोन वर्षांनंतर घडले, जेव्हा दहशतवाद्यांनी थेट चकमकीत आत्मसमर्पण केले. विशेष म्हणजे सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यासाठी त्यांच्या पालकांचीही मदत घेतली.

दरम्यान, कुलगामचे एसएसपी डॉ. संदीप चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलगामच्या हदिगाम गावातून या दहशतवाद्यांना अटक केली आहे. मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता भारतीय लष्कर आणि जेकेपी यांनी या भागात संयुक्त शोध मोहीम सुरु केली होती. बुधवारी पहाटे 2.30 च्या सुमारास संशयित घरांची झडती घेत असताना सुरक्षा दलांनी गोळीबार केला, ज्यामुळे चकमक झाली.

Security Forces
Jammu And Kashmir: हिंदू शिक्षिका रजनी बाला यांच्या हत्येचा लष्कराने घेतला बदला

सुरक्षा दलाने संयम बाळगला

दुसरीकडे, हे दोघेही नव्याने भरती झालेले स्थानिक तरुण आहेत. त्यांचे कुटुंबीय त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत होते. या नव्याने भरती झालेल्या दहशतवाद्यांची जम्मू आणि काश्मीर (Jammu And Kashmir) पोलिसांना ओळख पटली आहे. दोघेही लष्कराच्या अलीकडेच भरती झालेल्या मॉड्यूलचा भाग होते. या माहितीनंतर दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरु असतानाही सुरक्षा दलांनी संयम बाळगला. त्यांच्यावर गोळीबार केला नाही. दोन्ही दहशतवाद्यांना (Terrorists) घराच्या एका भागात कोंडून ठेवण्यात आले. त्यानंतर दोन्ही दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांना घटनास्थळी बोलावून आत्मसमर्पण करण्याचे आवाहन करण्यात आले.

Security Forces
Jammu and Kashmir: खांडीपोरा भागात चकमक; 1 दहशतवादी ठार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक चौकशीत या तरुणांचे ब्रेनवॉश करुन त्यांना लष्कर आणि आयएसआयच्या (ISI) सांगण्यावरुन देशविरोधी कारवाया आणि हत्या करण्याचे काम सोपवण्यात आल्याचे समोर आले आहे. भरटकलेल्या तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतीय लष्कर कटीबध्द आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com