लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी गजाआड

लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी गजाआड
LashkareToiba terrorist Gajaad

सांबा : जम्मू काश्मीर राज्यातील सांबा जिल्ह्यामधून लष्कर-ए- तोयबाचा दहशतवादी झाहूर अहमदला जम्मू काश्मीर पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या वर्षी जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील तीन भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या झाली होती. या प्रकरणामध्य़े झाहूर अहमद याचा सहभाग असल्याचा संशय होता. जाहूर याच्यावर कुलगाम जिल्ह्यातील फुर्राह भागात एका पोलिसाची हत्या केल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. त्याला पकडल्यानंतर पुढच्या तपासासाठी काश्मीरमध्ये आणण्यात आले आहे.

''अनंतनाग पोलिस पथकाने 12 आणि 13 फेब्रुवारीच्या रात्री  झाहूर अहमद या लष्कर-ए- तोयबाच्या दहशतवाद्याला सांबामधून त्याला ताब्यात घेतले होते. तो सांबामध्ये लपून बसल्याचे समजताच अनंतनाग पोलिस पथकाने आपल्या माहितीच्या आधारावर त्याला गजाआड  केले.'' असे वरिष्ठ पोलिंस अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

गेल्या  वर्षी  कुलगाम  मधील  वायके पोरा  वस्तीमधील  फिदा  हुसैन  यातू, उमर रमजान हाजम आणि उमर राशिद बेग या  तीन  भाजप कार्यकर्त्यांची  हत्य़ा करण्यात आली होती. यामध्ये त्याचा हात आसल्याचा आरोप त्याच्यावर  होता. हे तिघेजण एका  कारमधून रात्री जात असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. ज्य़ांनी त्यांच्यावर हल्ला केला होता त्यांना एका अल्टो कारमधून जाताना स्थानिकांनी पाहिले असल्याचे जम्मू काश्मीर पोलिसांनी सांगितले होते.    

केंद्र सरकारने गेल्या वर्षी  370 कलम हटवण्याचा मोठा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर थोड्याफार प्रमाणात दहशतवादी कारवाया वाढल्या होत्या. जम्मू काश्मीर मध्ये शांतता निर्माण करण्यासाठी त्याचबरोबर दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी शासन स्तारावरुन प्रयत्न करण्यात येत आहेत. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com