भारतीय पर्यटन उद्योग उद्ध्वस्त! दिल्लीहून न्यूयॉर्कसाठी शेवटचे तिकिट काही लाखात...

गोमंन्तक वृत्तसेवा
बुधवार, 28 एप्रिल 2021

कोरोना साथीच्या आजाराने भारतीय पर्यटन उद्योग उद्ध्वस्त केला आहे अस म्हणायला हरकत नाही. गेल्या वर्षी मार्चपासून एकाही विदेशी पर्यटकांनी भारत दौरा केलेला नाही. पर्यटन विभागाचे 60 हजार कोटींचे नुकसान झाले असा अंदाज वर्तविला जात आहे.

नवी दिल्ली: कोरोना साथीच्या आजाराने भारतीय पर्यटन उद्योग उद्ध्वस्त केला आहे अस म्हणायला हरकत नाही. गेल्या वर्षी मार्चपासून एकाही विदेशी पर्यटकांनी भारत दौरा केलेला नाही, कारण गेल्या वर्षी 20 मार्चपासून सरकारने पर्यटकांचा व्हिसा स्थगित केला आहे. पर्यटन विभागाचे 60 हजार कोटींचे नुकसान झाले असा अंदाज वर्तविला जात आहे.

टूर्स ऑपरेटर विदेशी  पर्यटकांकडून वर्षाकाठी 40-50 कोटी रुपयांचा व्यापार करत होते. गेल्या आर्थिक वर्षात त्यांनी एकही रूपया कमवला नाही. कोरोनामुळे प्रवास, सहली आणि हॉटेलशी जुळेलेल्या व्यावसायिकांची अवस्था बिकट झाली आहे. विदेशी पर्यटक गेल्या 13 महिन्यांपासून भारतात आले नाहीत. केंद्रीय पर्यटनमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी संसदेत सांगितले की, 20 मार्चपासून पर्यटक व्हिसा न दिल्याने 2010 च्या तुलनेत 2020 मध्ये विदेशी पर्यटकांची संख्या 75 टक्क्यांनी कमी झाली आहे.

ही गिधाडसारखे काम करण्याची वेळ नाही; दिल्ली उच्च न्यायालय 

90 टक्के कर्मचार्‍यांनी गमावल्या नोकर्‍या
इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्सचे सरचिटणीस रजनीश कायस्थ यांनी या विषयी मत व्यक्त केल आहे. त्यांच्या बहुतेक सदस्यांच्या व्यवसायावर 90 टक्के परिणाम झाला आणि त्याच्या व्यवसायात 60000 कोटी रुपयांचे नुकसान झाले. बहुतेक ऑपरेटरर्सनी 80 ते 90 टक्के कर्मचार्‍यांना कामावरून काढून चाकले याहेत किंवा त्याना  बिनपगारी रजेवर पाठवले आहे. त्यामुळे या उद्योगाला दोन्ही बाजूने फटका बसला आहे. व्यापार ठप्प झाल्याने मिळकत कमी झाली आहे. 79 हजाराचा रस्ता करही भरला आहे.

कोरोना विरोधातील लढाई आम्ही विरुध्द तुम्ही नसून आपण विरुध्द कोरोना 

भारतातून विदेशी उड्डाणे बंद
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेतील वाढते संक्रमण लक्षात घेता जवळपास सर्वच देशांनी भारताला रेड झओनमध्येच टाकले आहे. उड्डाणे थांबविले आहे. काही दिवस भारताततून येणाऱ्या नागरीकांना एंट्री नाकारली आहे. फक्त काही देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी आणि भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांना बाहेर बजाण्यासाठी उड्डाणे सुरू आहेत.

लंडनची तिकिटे दोन लाखांमध्ये उपलब्ध

मिळालेल्या माहीतीनुसार अशी स्थिती आहे की दिल्ली ते न्यूयॉर्कसाठी शेवटच्या विमानाचे तिकिट 7.50 लाख रुपयांना विकले गेले आहे. लंडनची तिकिटे दोन लाखांमध्ये उपलब्ध आहे, तेही फक्त यूकेच्या नागरिकांसाठीच. बऱ्याच विमान कंपन्या प्रवाश्याविना भारतातून परत जावे लागले आहे. आता भारतीयांना दुबई आणि मालदीव सारख्या पर्यटनस्थळांमध्ये ही प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.

राज्यांसाठी रेल्वेकडून कोविड केअर कोच निर्मिती 

संबंधित बातम्या