वेदनादायक किस्सा: लता ताईंना कुणीतरी दिले होते विष!

स्वर कोकिळा लता मंगेशकर बद्दल असे म्हटले जाते की, जेव्हा त्या 33 वर्षांच्या होत्या, तेव्हा कोणीतरी त्यांना विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता.
lata Mangeshkar Passed Away
lata Mangeshkar Passed AwayDainik Gomantak

स्वर कोकिळा लता मंगेशकर बद्दल असे म्हटले जाते की, जेव्हा त्या 33 वर्षांच्या होत्या, तेव्हा कोणीतरी त्यांना विष देऊन मारण्याचा (Lata Mangeshkar At The Age Of 33 Someone Had Given Poison) प्रयत्न केला होता. एकदा लता मंगेशकरांनी (lata Mangeshkar Passed Away) स्वतः या कथेवरून पडदा हटवला होता. त्यांनी एका संभाषणात सांगितले होते, "आम्ही मंगेशकर याबद्दल बोलत नाही कारण तो आमच्या आयुष्यातील सर्वात भयंकर टप्पा होता. ते वर्ष होते 1963, मला इतके अशक्त वाटू लागले होते की मला बेडवरून उठणेही शक्य नव्हते, परिस्थिती अशी होती. असे झाले की मला स्वतःहून चालताही येत नव्हते.

lata Mangeshkar Passed Away
जेष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

लताजींवर विश्वास ठेवला तर उपचारानंतर त्या हळूहळू बऱ्या झाल्या. त्या म्हणाल्या, "मला स्लो पॉयझनिंग दिल्याचे मला समजले होते. डॉक्टरांचे उपचार आणि माझा निश्चयाने मला परत आणले. तीन महिन्यांच्या बेड रेस्टनंतर मी पुन्हा रेकॉर्डिग सुरु केले.

आजारातून बरे झाल्यानंतर लताजींचे पहिले गाणे 'कहीं दीप जले कहीं दिल' हे हेमंत कुमार यांनी संगीतबद्ध केले. लताजी म्हणतात, "हेमंत दा घरी आले आणि रेकॉर्डिंगसाठी माझ्या आईची परवानगी घेतली. त्यांनी आईला वचन दिले की माझ्यामध्ये तणावाची लक्षणे दिसल्यास ते मला ताबडतोब घरी घेऊन येतील. सुदैवाने रेकॉर्डिंग चांगले झाले. मी माझा आवाज गमावला नव्हता. लताजींच्या या गाण्याला फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला आहे.

lata Mangeshkar Passed Away
लता मंगेशकर यांचे 'हे' पहिले गाणे का रिलीज झाले नाही?

लता मंगेशकर यांच्या म्हणण्यानुसार, मजरूह सुलतानपुरी यांची माझ्या रिकव्हरीमध्ये महत्त्वाची भूमिका होती. त्या सांगतात, मजरूह साहेब रोज संध्याकाळी घरी यायचे आणि माझ्या शेजारी बसून मला आनंद भेटण्यासाठी कविता वाचायचे. ते रात्रंदिवस व्यस्त असायचे आणि त्यांना झोपायलाही वेळ मिळत नव्हता, पण माझ्या आजारपणात ते रोज मला भेटायला यायचे. रात्रीच्या जेवणासाठी ते माझ्यासाठी तयार केलेले साधे अन्नही सोबत खायचे आणि मला कंपनी द्यायचे. मजरूह साहब नसते तर मी त्या कठीण प्रसंगावर मात करू शकलो नसते.

जेव्हा विचारण्यात आले की त्यांना विष कोणी दिले हे कधी कळले का? तर त्यांनी उत्तर दिले, हो, मला कळले, परंतु आमच्याकडे त्या व्यक्तीविरुद्ध कोणतेही पुरावे नसल्यामुळे आम्ही कोणतीही कारवाई केली नाहीये.

lata Mangeshkar Passed Away
Goodbye Lata Didi: 'भारतीय संस्कृतीच्या स्वरलतांना येणारी पिढी स्मरणात ठेवेल'

जेव्हा लताजींना विचारण्यात आले की डॉक्टरांनी त्यांना सांगितले की, त्या पुन्हा कधीही गाणे गाऊ शकणार नाहीत हे खरे आहे का? तर प्रतिसादात त्या म्हणाली, "हे खरे नाही. माझ्या स्लो पॉयझनभोवती विणलेली ही एक काल्पनिक कथा होती. डॉक्टरांनी मला सांगितले नाही की, मी कधीच गाणे गाऊ शकणार नाही. आमचे फॅमिली डॉक्टर ज्यांनी मला बरे केले, असे आर.पी. कपूर यांनी मला ते सांगितले. ते माझ्या पाठीशी उभे राहीले, पण मला हे स्पष्ट करायचे आहे की हा गैरसमज गेल्या काही वर्षांत झाला आहे. मी माझा आवाज गमावला नव्हता."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com