कोशिंबीरी उशिरा वाढणं पत्निच्या बेतलं जिवावर 

गोमंन्तक वृत्तसेवा
बुधवार, 2 जून 2021

या घटनेनंतर आरोपी पती फरार झाला असून शामली पोलिस त्याचा शोध घेत आहे. 

कुटुंब म्हटलं भांड्याला भांड लागतं परंतु भांडण किती टोकापर्यंत जाऊ शकतं हे उत्तरप्रदेशमधील (Uttar Pradesh) घटनेतून अंदाज येऊ शकतो. जेवणात कोशिंबीर देण्यास वेळ लागल्यामुळे पतीने पत्नीचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर आरोपी पती फरार झाला असून श्यामली पोलिस (Shyamli police) त्याचा शोध घेत आहे. (Late growing lettuce at the expense of the wife)

या घटनेच्या दिवशी आरोपी मुरली सिंह (Murali Singh) नेहमीप्रमाणे घरी जेवत होता. त्याची पत्नी सुदेशा वेगळ्या कामामध्ये गुंतली होती. त्यामुळे मुरली जेवत असताना त्याच्या ताटामध्ये सुदेशाने(Sudesha) कोशिंबीर उशिरा वाढली. ही बाब आरोपी मुरली सिंहला खटकली आणि त्याच्या रागाचा पारा चांगलाच चढला. यानंतर त्याने क्षणाचाही विलंब न करता पत्नी आणि मुलावर जीवघेणा हल्ला केला. तसेच हातामधील कुदळीने पत्नीवर वार केला. यात सुदेशाचा जागीच मृत्यू झाला. तर आईला वाचवण्यासाठी पुढे आलेला 20 वर्षीय मुलगा अजय यामध्ये गंभीर जखमी झाला. घरामध्ये भांडण तसेच आरडाओरडण्याचा आवाज आल्यानंतर शेजाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. तेव्हा पत्नी सुदेशा आणि मुलगा अजय रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला. या घटनेनंतर आरोपी मुरली सिंह घटनास्थळाहून पळून गेला. 

आईनेच केली 5 मुलांविरोधात FIR दाखल; तीघांना अटक

या धक्कादायक प्रकरणासंबंधी बाबरी पोलिस ठाण्यामध्ये (Babri Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहितेनुसार (Indian Penal Code) कलम 302 आणि 307 अंतर्गत आरोपी मुरली विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पत्नी सुदेशा हिचं पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं आहे. तर मुलगा अजयची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. आरोपी मुरलीला पकडण्यासाठी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

संबंधित बातम्या