मजुरांना मोफत अन्नधान्य देणाऱ्या आत्मनिर्भर भारत योजनेला सुरुवात

dainik gomantak
रविवार, 17 मे 2020

देशाच्या कोणत्याही भागातील अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी अंदमान आणि लक्षद्वीप बेटांसह संपूर्ण देशभरातील 2122 गोदामांमध्ये पुरेसा साठा ठेवण्यात आला आहे. उत्पादित क्षेत्रातून रेल्वे, रस्ते आणि समुद्रमार्गे वाहतूक करून उपभोगी राज्य/केंद्रशासित प्रदेशातील अन्नधान्याचा साठा नियमितपणे भरण्यात येत आहे.

नवी दिल्‍ली, 

आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत एनएफएसए किंवा राज्य पीडीएस कार्ड योजनेंतर्गत समावेश नसलेल्या 8 कोटी स्थलांतरित मजुरांना मे आणि जून 2020 या दोन महिन्यांसाठी दरमहा 5 रुपये किलो दराने मोफत अन्नधान्य वाटप करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी अंदाजे 3500 कोटी रुपयांचा खर्च येणार असून हा संपूर्ण खर्च केंद्र सरकार उचलणार आहे. या योजनेंतर्गत संपूर्ण भारतात 8 लाख मेट्रिक टन (एलएमटी) अन्नधान्याचे वाटप केले जाणार आहे.

या योजनेंतर्गत भारतीय अन्न महामंडळाने (एफसीआय) अगोदरच अन्नधान्याचे वितरण सुरु केले आहे. पात्र स्थलांतरित मजुरांना पुढील वितरण करण्यासाठी आज तामिळनाडू येथून 1109 मे.टन आणि केरळमधून 151 मे.टन तांदूळ संबंधित राज्य सरकारांना देण्यात आला. या योजनेंतर्गत देशभरात अन्नधान्याचे वितरण करण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली असून भारतातील प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात पुरेसा साठा उपलब्ध आहे. देशाच्या कोणत्याही भागातील अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी अंदमान आणि लक्षद्वीप बेटांसह संपूर्ण देशभरातील 2122 गोदामांमध्ये पुरेसा साठा ठेवण्यात आला आहे. उत्पादित क्षेत्रातून रेल्वे, रस्ते आणि समुद्रमार्गे वाहतूक करून उपभोगी राज्य/केंद्रशासित प्रदेशातील अन्नधान्याचा साठा नियमितपणे भरण्यात येत आहे.

संबंधित बातम्या