'विज्ञानाला चालना' उपक्रमाचा प्रारंभ

 Launch of 'Leading Science' initiative
Launch of 'Leading Science' initiative

 नवी दिल्ली,

विज्ञान तंत्रज्ञान संशोधन मंडळाने, संशोधकीय पाठ्यवृत्ती देण्यासाठी, क्षमता वाढविण्यासाठी आणि विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यासाठी, देशभरात एकच व्यासपीठ असावे, या दृष्टीने 'ऍक्सिलरेट विज्ञान' (AV) या उपक्रमाला प्रारंभ केला आहे. या उपक्रमाची अधिक माहिती www.acceleratevigyan.gov.in  या वेबपोर्टलवर उपलब्ध आहे. ‘एव्ही’ने याआधीच हिवाळी सत्रासाठी "अभ्यास" या पूरक भागासाठी अर्ज मागविले आहेत.

या आंतरमंत्रालयीन योजनेचा प्राथमिक उद्देश, उच्चस्तरीय वैज्ञानिक संशोधनाला प्रोत्साहन देणे आणि विज्ञानाधिष्ठीत मनुष्यबळ निर्माण करणे, हा असून त्यामुळे संशोधनातील संधी तयार होऊन ज्ञानाधिष्ठित आर्थिक व्यवस्था निर्माण होईल. सर्व संशोधनाचा पाया, हा गुणवत्ता विकास आणि उत्तम प्रशिक्षित संशोधक आहेत, हे ओळखून एव्ही संशोधन क्षमतांना ओळखून, मार्गदर्शन करून, तसेच देशभरात अशा प्रशिक्षण देणाऱ्या कार्यशाळा आयोजित करण्याचा आरंभ आणि सशक्तीकरण करणार आहे.

यावेळी बोलताना एसईआरबीचे (SERB) सल्लागार डॉ. राजीव महाजन म्हणाले, की संशोधनाच्या पायाचा विस्तार करण्यासाठी पदव्युत्तर कार्यक्रमांचे एकत्रीकरण/विलीनीकरण करणे, उत्तम दर्जेदार कार्यशाळांच्या आयोजनावर लक्ष केंद्रित करणे आणि ज्यांना संशोधनासाठी सोय वा स्रोत उपलब्ध नसतील, त्यांच्यासाठी संशोधकीय पाठ्यवृत्ती देऊ करणे, ही व्यापक तीन ध्येय आमच्या समोर आहेत. येत्या दोन महिन्यांत संस्था याकरिता एक ऍप ही सुरू करणार आहे.

अभ्यास हा कार्यक्रम, पदव्युत्तर आणि पीएचडी विद्यार्थ्यांच्या, वेगवेगळ्या क्षेत्रातील विद्याशाखा, संशोधकीय क्षमतेचा विकास करून त्याला चालना आणि प्रोत्साहन देऊन त्यांची काळजी घेत सक्षमीकरण करून, देशातील संशोधनाचा विकास करण्यासाठी आहे. त्याचे उच्च दर्जाच्या कार्यशाळा (KARAYALA) आणि संशोधन पाठ्यवृत्ती (VRITIKA) असे दोन भाग आहेत. ही योजना, ज्या संशोधकांना शिक्षणासाठी क्षमता/ सोय/ पायाभूत सुविधा मर्यादित स्वरूपात उपलब्ध आहेत, अशांसाठी आहे. सध्या कार्यशाळा आणि वृत्तिका यासाठी मागविलेले अर्ज हिवाळी सत्रासाठी (कालावधी DEC 2020 to JAN 2021) आहेत.

या योजनेची गती वाढविण्यासाठी,येत्या पाच वर्षात प्रमुख वैज्ञानिक संस्था आणि प्रयोगशाळा यांच्या सहयोगाने 1000 उत्तम दर्जाच्या कार्यशाळा (विशिष्ट संकल्पना समोर ठेवून) आणि  25000 पदव्युत्तर आणि डॉक्टरल विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणार असल्याचेही डॉ. महाजन यांनी यावेळी सांगितले. या संस्थांतील पाठ्यव्रूत्तींचे केंद्रीय समन्वयीकरण करून दरवर्षी 1000 योग्य संशोधकांना संधी दिली जाईल.

वैज्ञानिक कार्यक्रमांचे आयोजन विशेषतः एकत्रीकरण/विलीनीकरण करण्याचे काम ‘एव्ही’ द्रुतगतीने करेल. याप्रमाणे एसईआरबीला ही योजना कार्यान्वित करण्यात मदत करण्यासाठी सर्व वैज्ञानिक मंत्रालये/विभागांची आणि काही इतर यांची मिळून आंतरमंत्रालयीन निरिक्षण समिती म्हणजे इंटर मिनिस्ट्रिअल ओव्हरसीईंग कमिटी (IMOC) स्थापन करण्यात आली आहे.

अशाप्रकारे एव्हीने तयार केलेली आणि या प्रक्रियेत हस्तगत झालेली विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची संग्रहीत माहिती, देशाच्या सक्षमीकरणासाठी सर्व संबंधितांना पुरविण्यात येईल. अशाप्रकारे ही योजना देशातील वैज्ञानिक समुदायाच्या कारकिर्दीच्या विकासाचा मार्ग आणि सामाजिक उत्तरदायित्वाचे संचित ठरेल. india india 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com