बिहार निवडणुकीत शत्रुघ्न सिन्हांचे पुत्र लव सिन्हा आजमावणार नशीब

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

भाजपचे अरुण सिन्हा यांच्याशी त्यांची लढत होईल. गेल्या लोकसभा निवडणुकीत शत्रुघ्न सिन्हा यांना पाटण्यातून हार पत्करावी लागली होती.

पाटणा-  'बिहारी बाबू’ अशी ओळख असलेले अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचे पुत्र लव सिन्हा हे यंदाच्या बिहार विधानसभा निवडणुकीत नशीब अजमावणार आहेत. पाटण्यातील बांकीपूर मतदारसंघातून ते काँग्रेसच्या तिकिटावर लढणार आहेत.

भाजपचे अरुण सिन्हा यांच्याशी त्यांची लढत होईल. गेल्या लोकसभा निवडणुकीत शत्रुघ्न सिन्हा यांना पाटण्यातून हार पत्करावी लागली होती.  ‘मंडल मसीहा’ मानले जाणारे शरद यादव यांची मुलगी सुभाषिनी राज राव याही यावेळी काँग्रेसकडून निवडणूक लढवत असून मधेपुरा जिल्ह्यात बिहारीगंज मतदारसंघातून त्या सोमवारी (ता. १९) उमेदवारी  अर्ज दाखल करणार आहेत. 
 

संबंधित बातम्या