Uttarakhand glacier accident : आतापर्यंत 31 जणांचा मृत्यू; तर तब्बल 197 जण अजूनही बेपत्ता    

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

उत्तराखंड पोलिसांनी आज या दुर्घटनेसंदर्भात एक हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. एखाद्या हरवलेल्या व्यक्तीच्या माहितीसाठी +91 7500016666 या नंबरवर आणि डीआयजी लॉ अँड आर्डरवर संपर्क साधण्याची सूचना पोलिसांनी केली आहे.

उत्तराखंड मधील चामोली जिल्ह्यात हिमनदी फुटल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 31 जणांचा मृत्यू झालेला असल्याची माहिती मिळाली आहे. तर अजून तब्बल 197 जण बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. उत्तराखंड पोलिसांनी आज या घटनेबद्दल माहिती देताना 31 जणांचा मृतदेह सापडला असून, 197 जण बेपत्ता असल्याचे सांगितले आहे. शिवाय मृत पावलेल्या 31 जणांपैकी आठ मृतदेहांची ओळख पटल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. 

देशाला स्वातंत्र्य कसं मिळालं माहितीय? अखिलेश यादवांचा पंतप्रधान मोदींना टोला

उत्तराखंड पोलिसांनी आज या दुर्घटनेसंदर्भात एक हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. एखाद्या हरवलेल्या व्यक्तीच्या माहितीसाठी +91 7500016666 या नंबरवर आणि डीआयजी लॉ अँड आर्डरवर संपर्क साधण्याची सूचना पोलिसांनी केली आहे. आयटीबीपी, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि अन्य पथके तपोवन बोगद्यात रेस्क्यू ऑपरेशन करत असून, या ठिकाणी ड्रोनचा देखील वापर करण्यात येत आहे. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गाळ आणि चिखल साचला असल्याचे आयटीबीपी आणि एसडीआरएफने म्हटले आहे. 

त्यानंतर, सध्याच्या घडीला बादल्यांमधून जितका गाळ बाहेर काढता येईल तेवढा काढण्यात येत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. मात्र यासाठी बराच वेळ लागत असल्याचे या अधिकाऱ्याने म्हटले आहे. याशिवाय आतापर्यंत बोगद्याच्या 60 मीटर पर्यंत आता जाता आले असून, अजून 30 मीटर शिल्लक असल्याचे रेस्क्यू ऑपरेशन मध्ये सहभागी असलेल्या एका मशीन ऑपरेटरने सांगितले. तसेच यापूर्वी अशी परिस्थिती पूर्वी कधीही पाहिली नसल्याचे या ऑपरेटरने सांगितले आहे. 

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत रविवारी 6 तारखेला उत्तराखंडच्या चामोली जिल्ह्यात हिमनदी फुटल्यानंतर बोगद्यात अडकलेल्यांना वाचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. याशिवाय इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसांनी (आयटीबीपी) आपला नियंत्रण कक्ष याठिकाणी उभा केला असून त्यांचे 450 जवान शोध आणि बचाव कार्य करीत असल्याचे अमित शहा यांनी सांगितले. यानंतर, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत हे देखील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.   
    

 

संबंधित बातम्या