पंजाबमध्ये लिंबू घोटाळा; कारागृह अधीक्षक निलंबित

एडीजीपी कारागृह वरिंदर कुमार यांनी गुरनाम लाल यांना केलं निलंबित
पंजाबमध्ये लिंबू घोटाळा; कारागृह अधीक्षक निलंबित
Lemon Price Dainik Gomantak

देशभर उन्हाचे चटके बसत असताना देशभरातील नागरिक गारवा मिळण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबत आहेत. उन्हाळ्यात लिंबू वापरुन वेगवेगळी शितपेये तयार केली जातात. यातूनच यंदा ही उन्हाळ्यात लिंबूची मागणी वाढली असून मागणीच्या पुरवठ्यानुसार लिंबू पुरवठा कमी झाल्यावर लिंबूचे दर ही गगनाला भिडले आहेत. या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये लिंबू घोटाळ्या झाल्याचं स्पष्ट झालं आहे. (Lemon scandal in Punjab; Prison Superintendent Suspended )


Lemon Price
प्रवाशांच्या अडचणीत वाढ! रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल, येथे चेक करा यादी

या प्रकरणी कपूरथला मॉडर्न जेलचे अधीक्षक गुरनाम लाल यांना निलंबित करण्यात आले आहे. कारागृह मंत्री हरजोत बैस यांच्या आदेशानुसार कारागृह अधीक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. हे संपूर्ण प्रकरण ५० किलो लिंबाच्या खरेदीशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे.

कारागृहातील लिंबू घोटाळ्यामुळे तुरुंगमंत्री हरजोत बैंस यांच्या आदेशानुसार एडीजीपी कारागृह वरिंदर कुमार यांनी गुरनाम लाल यांना निलंबित केले आहे. कारागृह अधीक्षकांनी रेशन खरेदीमध्ये ५० किलो लिंबू दाखवले होते, तेव्हा बाजारात लिंबाचा भाव २०० रुपयांपेक्षा जास्त होता. मात्र, त्या कैद्यांनाही हे लिंबू मिळाले नाहीत.


Lemon Price
Xiaomi च्या अधिकाऱ्यांना करावा लागला 'शारीरिक हिंसाचाराचा' सामना, ED वर आरोप

चौकशीसाठी समिती पोहोचल्यावर त्याचं बिंग फुटलं. त्यावेळी कैद्यांनी लिंबू मिळत नसल्याचे सांगितले. देशात लिंबूचे भाव गगनाला भिडलेले असताना १५ ते ३० एप्रिलदरम्यान लिंबू खरेदी दाखवण्यात आली. या प्रकरणातील तपासादरम्यान गैरव्यवहारासह अनेक गैरप्रकारही समोर आले आहेत. पीठातही गैरव्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे.

तुरुंग अधिकाऱ्याने 50 किलो लिंबू खरेदी केल्याचे दाखवले होते मात्र, लिंबू स्वयंपाकघरात वापरले जात नसल्याचं कैद्यांनी सांगितलं. बाजारात लिंबाचा भाव २०० रुपये किलोपेक्षा जास्त असताना हे लिंबू खरेदी करण्यात आले. मात्र यातील घोटाळा उघड झाल्यानंतर एडीजीपी कारागृह वरिंदर कुमार यांनी गुरनाम लाल यांना निलंबित केलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.