Leopard Cub Video: छत्तीसगढमध्ये बिबट्याच्या बछड्याचं दर्शन, पाहा व्हिडिओ

गरियाबंद जिल्ह्यातील गनियारी गावात तलावाच्या काठावर बिबट्याच्या बछड्याचे दर्शन झाले.
Leopard cub Video:
Leopard cub Video:Dainik Gomantak

Leopard Cub Video: गरियाबंद जिल्ह्यातील गनियारी गावात तलावाच्या काठावर बिबट्याच्या बछड्याचे दर्शन झाले. बिबट्याचा बछडा आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली असून ते पाहण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने आले होते. दुसरीकडे वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून बछड्याला ताब्यात घेऊन जंगलात सुखरूप सोडले.

मिळालेल्या माहितीनुसार, गावालगतच्या जंगलात आज पहाटे ग्रामस्थ रोजगार हमीच्या कामात मग्न होते. त्यानंतर ग्रामस्थांना बिबट्याचे पिल्लू दिसले. यानंतर ग्रामस्थांनी वनविभागाला माहिती दिली. कोणताही अनुचित प्रकार घडण्याआधीच वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून चिमुरड्याचे संरक्षण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी जवळच मादी बिबट्या असण्याची शक्यता पाहता गावात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com