यूपी: शालेय अभ्यासक्रमात योगी आणि रामदेव बाबांचे धडे

गोमंन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 1 जून 2021

चौधरी चरण सिंह विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाने नवीन अभ्यासक्रमाला मान्यता दिली आहे.

देशात कोरोनाचं संकट (Covid19) घोंघावत असताना “अ‍ॅलोपॅथी हे मूर्ख विज्ञान आहे” असं म्हणणाऱ्या रामदेव बाबा(Ramdev Baba) यांचा योगातील तज्ञ म्हणून विद्यापीठातील अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. तसेच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ(Chief Minister Yogi Adityanath) यांनी लिखाण केलेल्या पुस्तकाचा देखील अभ्यासक्रमात समावेश केला आहे. मेरठमधील चौधरी चरण सिंह विद्यापीठात (Chaudhary Charan Singh University) विद्यार्थी आता योगी आदित्यानाथ आणि रामदेब बाबा यांच्या विषयी अभ्यास करणार आहेत. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात यांचा समावेश करण्याचा निर्णय अभ्यास मंडळाने घेतला आहे. तसेच या दोघांव्यतिरिक्त बशीर बद्र, कुवर बैचेन, जग्गी वासुदेव यांचाही समावेश अभ्यासक्रमात समावेश केला आहे. (UP Lessons of Yogi and Ramdev Baba in school curriculum)

चौधरी चरण सिंह विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाने नवीन अभ्यासक्रमाला मान्यता दिली आहे. नव्या अभ्यासक्रमात योगी आदित्यनाथ यांनी  हठयोगावर लिहलेल्या पुस्तकाबद्दल शिकवण्यात येणार आहे. गोरखनाथ ट्रस्टकडून योगी आदित्यनाथ यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. त्यांच्या या हठयोगावरील विचारांनी विद्यार्थ्यांना अधिक सक्षम होण्याची संधी मिळणार आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री एम्स रुग्णालयात दाखल, बारावीचा निर्णय लांबणीवर

विद्यापीठाच्या अभ्यासमंडळाने रामदेव यांच्या योग चिकित्सा रहस्य आणि योगाभ्यास या पुस्तकांचा देखील अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. कलासाखेच्या अभ्यासक्रमात या पुस्तकाचा समावेश करण्यात आला आहे. कलाशाखेच्या तत्वज्ञानाच्या विषयामध्ये थेअरी आणि प्रात्यक्षिक अभ्यास असणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार (2021-22) अभ्यास मंडळाच्या बैठकीत नवीन अभ्यासक्रमावर शिक्कामोर्तब केले आहे. नव्या पिढीला भारतातील सर्व क्षेत्रातील समृद्ध वारश्याविषयी माहिती घेता येणार आहे, अशी माहिती डॉ. डी.एन सिंह यांनी दिली आहे. चौधरी चरण सिंह विद्यापीठाच्या विज्ञान शाखेच्या अभ्यासक्रमात आर्यभट्ट, भास्कराचार्य, लीलावती, माधवाचार्य आणि स्वामी कृष्णतीर्थ यांच्या योगदानाविषयी माहीतीही देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या