चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्याला पकडून गोळ्या घालू; मंत्री भडकले

निष्पाप चिमुरडीच्या सोबत असे निर्घृण कृत्य करुन तिची हत्या करणाऱ्या नराधमाचा एन्काउंटरच व्हायला हवे.या पेक्षा वेगळी शिक्षा नाहीच.असा जोरदार आक्रमकपणा तेलंगाणाचे मंत्री चामाकुरा मल्ल रेड्डी यांनी घेतला.
चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्याला पकडून गोळ्या घालू; मंत्री भडकले
तेलंगाणाचे मंत्री चामाकुरा मल्ल रेड्डीDainik Gomantak

हैदराबाद: देशाला लाजवणारी पुन्हा एकदा दुदैवी घटना घडली. तेलंगाणामध्ये एका 6 वर्षांच्या लहानग्या चिमुरडीचा बलात्कार (Rape)करुन मारून टाकण्यात आले आहे. या घटनेमुळे सगळ्या राज्यभर तणावाचे वातावरण तयार झाले आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे.

तेलंगाणामध्ये (Telangana)एका 6 वर्षांच्या लहानग्या जीवाचा बलात्कार करुन हत्या करण्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गेल्या काही दिवसात बलात्काराच्या घटना होत आहेत. त्यात आणखीन भर पडली त्यामुळे राज्यभर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून,फरार आरोपींना पकडून त्यांना जागीच गोळ्या घालून जागीच ठार करणार, असा जोरदार आक्रमकपणा तेलंगाणाचे मंत्री चामाकुरा मल्ल रेड्डी ( Chamakura Malla Reddy) यांनी घेतला आहे. तसेच या आरोपींवर राज्य सरकारने 10 लाखांचे (10 lakhs)बक्षीस ठेवले आहे.

 तेलंगाणाचे मंत्री चामाकुरा मल्ल रेड्डी
हा बलात्कार नव्हे, तर मग काय?

कशी घडली घटना?

तेलंगानामध्ये सैदाबाद(Saidabad) येथे राहणाऱ्या 6 वर्षीय चिमुरडीचे 9 सप्टेंबरला शेजारील 30 वर्षीय आरोपीने अपहरण केले. त्यानंतर संध्याकाळी 5 नंतर मुलगी घरात नसल्याने सर्वत्र तिचा शोध सुरु झाला. त्यानंतर मध्यरात्री ही चिमुरडी शेजारच्याच घरात मृतावस्थेत सापडली. या घटनेनंतर पल्लकोंडा राजू हा आरोपी फरार आहे. या आरोपीने बलात्कार करून चिमुरडीचा हत्या केली, असा दावा पोलिसांनी केला आहे.

निर्दयी गुन्हेगाराला पकडण्यासाठी मिळणार 10 लाखांचं बक्षीस:

पल्लकोंडा राजू गुन्हेगाराला पकडण्यासाठी तेलंगाणा पोलिसांनी 15 पथके (Squads)तयार केली आहेत. ही पथके विविध भागांमध्ये पाठवण्यात आली आहेत. शिवाय, याला पकडवून देणाऱ्याला 10 लाखांचे बक्षीस दिले जाईल. अशी मोठी घोषणा पोलिसांकडून करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेनंतर सर्वत्र जनतेत रोषाचे वातावरण पाहण्यास मिळत आहे. घटनेची पाहणी करण्यासाठी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचले, तेव्हा स्थानिकांनी चिडून पोलिसांवरच दगडफेक केली.

 तेलंगाणाचे मंत्री चामाकुरा मल्ल रेड्डी
कर्नाटकच्या म्हैसूर बलात्कार प्रकपणात 5 आरोपींना अटक

नराधम सापडला की जागीच गोळ्या घालू:

दरम्यान, तेलंगाणाचे मंत्री चामाकुरा मल्ल रेड्डी यांनी याबाबत अतिशय कठोर भूमिका घेतली आहे. गुन्हेगारच जागीच एन्काऊंटर (Encounter)केले जाईल असे थेट माध्यमांसमोर सांगितले आहे. पुढे बोलतांना रेड्डी म्हणाले की, निष्पाप चिमुरडीच्या सोबत असे निर्घृण कृत्य करुन तिची हत्या करणाऱ्या नराधमाचा एन्काउंटरच व्हायला हवे.या पेक्षा वेगळी शिक्षा नाहीच. आम्ही आरोपीला पकडून त्याचे जागीच एन्काऊंटर करुन टाकू. आम्ही पीडित कुटुंबासोबत आहोत. त्यांची शक्य तितकी मदत करु.

दरम्यान, पोलिसांनी आरोपीला ओळखण्यासाठी त्याच्या काही खुणा प्रसिद्ध केल्या आहेत. ज्यामध्ये आरोपी 30 वर्षांचा असून त्याची उंची 5 फूट 9 इंच आहे. त्याचे केस लांब असून, त्याच्या हातावर टॅटू आहे. हा आरोपी बऱ्याचदा गळ्याभोवती स्कार्फ सुद्धा गुंडाळतो.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com