पुद्दुचेरीत कॉंग्रेस सरकार वाचणार की राष्ट्रपती राजवट? या आहेत 4 शक्यता

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

पुद्दुचेरी केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांच्यासाठी आजचा दिवस कसोटीचा ठरणार आहे. उपराज्यपाल टी. सुंदरराजन यांनी आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत विधानसभेत फ्लोअर टेस्टचे आदेश दिले आहेत.

नवी दिल्ली :  पुद्दुचेरी केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांच्यासाठी आजचा दिवस कसोटीचा ठरणार आहे. उपराज्यपाल टी. सुंदरराजन यांनी आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत विधानसभेत फ्लोअर टेस्टचे आदेश दिले आहेत. सरकारची वाचवणे नारायणसामींसाठी कठीण आव्हान असेल, ते हे कसे साधणार याकडे केंद्रिय नेते व राजकिय समिक्षकांचे लक्ष लागून आहे. चार आमदारांच्या राजीनाम्यानंतर नारायणसामी यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस सरकारवर संकट ओढावले आहे.

भारत-चीन सैन्य स्तरावरील दहावी फेरी पार पडली; पॅंगॉन्गच्या माहितीची झाली देवाण-घेवाण   

पुद्दुचेरीमध्ये ओढावलेले राजकिय संकट हा दोन पक्षांमधील संघर्षाचा परिणाम आहे. 18 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी भारतीय जनता पक्ष लोकशाही पद्धतीने निवडलेल्या सरकारला पाडण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला होता. तथापि, पुद्दुचेराच्या राजकारणात खालील चार शक्यता अस्तित्वात येऊ शकतात. 

पहिली शक्यता - सरकार पडेल

रविवारी सायंकाळी उशिरा आणखी काही आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर सध्या कॉंग्रेस सरकारची प्रकृती खालावली आहे. व्ही. नारायणसामी यांचे सरकार फ्लोअर टेस्टमध्ये पडेल असे दिसते. विधानसभेचे 33 सदस्य असले तरी कॉंग्रेसच्या अनेक आमदारांच्या राजीनाम्यानंतर विधानसभेची एकूण संख्या 26 वर आली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, कॉंग्रेस आणि द्रमुककडे एकूण 12 आमदार आहेत, ज्यात एका स्वतंत्र आमदाराचा समावेश आहे. विरोधी पक्षाच्या युतीकडे एकूण 14 आमदार आहेत.

दुसरी शक्यता - विधानसभा सभापती काही आमदारांना अपात्र ठरवू शकतात

पुद्दुचेरीमध्ये कॉंग्रेस सतत आमदारांसाठी घोडेबाजार होत असल्याचा आरोप करत आहे. भाजपा त्यांचे सरकार पाडण्यासाठी कट रचत असल्याचे कॉंग्रेसचे अनेक बडे नेते म्हणत आहेत. अशा परिस्थितीत सभापती काही आमदारांना अपात्र ठरवू शकतात. असे झाल्यास एकूण आमदारांची संख्या आणखी कमी होऊ शकते. अशा परिस्थितीत नारायणसामी यांचे सरकार वाचू शकते.

ममता बॅनर्जी यांचा मोठा निर्णय; पेट्रोल व डिझेलच्या किमतीत केली एक रुपयाची घट

तिसरी शक्यता : विरोधी पक्षांच्या आमदारांवर कॉंग्रेसची नजर

सध्या पुडुचेरीमध्ये बर्‍याच राजकिय हालचाली होत आहेत. असे म्हटले जात आहे की, मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी विरोधी पक्षातील काही आमदारांना आपल्या बाजूने करू शकतात. कॉंग्रेसचे लक्ष एआयएडीएमकेच्या चार आमदारांवर आहे. या आमदारांशी सध्या चर्चा सुरू असल्याचा दावा अनेक दिग्गज नेते करीत आहेत. जर असे झाले, तर हे चारही आमदार आज फ्लोअर टेस्टला उपस्थित राहणार नाहीत. अशा परिस्थितीत मतदानाच्या वेळी विधानसभेची संख्या 26 सदस्यांहूनही पुढे येऊ शकते. असे झाल्यास मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांचे सरकार वाचेल. 

चौथी शक्यता - राष्ट्रपती राजवट

पुद्दुचेरीमध्ये राष्ट्रपती राजवट होण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही. हा देखील एक पर्याय आहे. उपराज्यपाल तमिलासाई सुंदरराजन हे तामिळनाडूमधील भाजपचे माजी अध्यक्ष आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार गोष्टी भाजपच्या प्लॅननुसार न झाल्यास, राष्ट्रपती राजवटही लागू केली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. उपराज्यपाल कायदा व सुव्यवस्थेचा हवाला देऊन राष्ट्रपती राजवटीची शिफारस करू शकतात.
 

संबंधित बातम्या