Sonia Gandhi Journey: शेवटी जे नाकारलं तेच पदरात पडलं; इटली ते भारत व्हाया केंम्ब्रिज सोनिया गांधींचा जीवनप्रवास

सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचे आयुष्य एखाद्या सिनेमाच्या कथेला शोभेल असे आहे.
Sonia Gandhi Life Journey | Sonia Gandhi Birthday| Congress Politician Sonia Gandhi
Sonia Gandhi Life Journey | Sonia Gandhi Birthday| Congress Politician Sonia Gandhi Dainik Gomantak

Sonia Gandhi Life Journey: भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पत्नी आणि काँग्रेसच्या प्रमुख नेत्या सोनिया गांधी या आज (9 डिसेंबर) त्यांचा 76 वा वाढदिवस साजरा करत आहेत. सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचे आयुष्य एखाद्या सिनेमाच्या कथेला शोभेल असे आहे. मुळच्या इटलीतील असलेल्या सोनिया माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा मुलगा राजीव यांच्या प्रेमात पडल्या आणि त्यांच्याशी लग्न करण्यासाठी भारतात आल्या. त्यांनी आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत, अनेक धक्कादायक घटनांचा त्यांना सामना करावा लागला. तसेच, स्वत:ला नेहमीच राजकारणापासून दूर ठेवलं पण, शेवटी राजकारणचं त्यांच्या पदरात पडलं.

Sonia Gandhi Life Journey | Sonia Gandhi Birthday| Congress Politician Sonia Gandhi
Sonia Gandhi: सोनिया गांधी यांच्याबद्दल दहा विशेष गोष्टी

सुरुवातीच्या काळात हिंदी न बोलू शकणार्‍या सोनिया गांधींवर काँग्रेसह विरोधकांनी देखील टीका केली. यापलिकडे त्यांनी काँग्रेसला मोठा पक्ष म्हणून प्रास्थापित करत, स्वतःची देखील सर्वात प्रभावी नेते म्हणून ओळख निर्माण केली. (Sonia Gandhi Life Journey)

इटली ते केंब्रिज

सोनिया माइनो यांचा जन्म 9 डिसेंबर 1946 रोजी लुसियाना, इटली येथे स्टेफानो आणि पाओला माइनो यांच्या घरी झाला. रोमन कॅथोलिक ख्रिश्चन कुटुंबात जन्माला आलेल्या सोनिया यांना नादिया आणि अनुष्का या दोन बहीणी देखील आहेत. फ्लाइट अटेंडंट होण्याच्या उद्देशाने सोनिया केंब्रिज विद्यापीठात आल्या. केंब्रिजमध्ये सोनिया गांधी आणि राजीव गांधी यांची भेट झाली. येथेच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी भारतात येऊन लग्न केले.

Sonia Gandhi Life Journey | Sonia Gandhi Birthday| Congress Politician Sonia Gandhi
Kolhapur: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळला! कोल्हापुरात आजपासून 15 दिवस जमावबंदीचा आदेश

इंदिरा गांधी यांची हत्या व पती राजीव गांधी यांचा राजकारणात प्रवेश

राजीव गांधी यांच्या आई इंदिरा गांधी (Indira Gandhi) या भारताच्या पंतप्रधान असताना राजीव गांधी यांनी पायलट म्हणून करिअर निवडले. यावेळी त्यांचे धाकटे बंधू संजय गांधी आईसोबत राजकारणात सक्रिय होते. पण 1981 मध्ये संजय गांधी यांचे निधन झाले. त्यानंतर राजीव गांधी काही अंशी राजकारणात सक्रिय झाले. 1984 मध्ये इंदिरा गांधींची हत्या (Assassination of Indira Gandhi) करण्यात आली, त्यानंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले. विशेष म्हणजे सोनिया गांधी यांचा राजीव गांधींच्या राजकारणात प्रवेशाला विरोध होता.

राजीव गांधी यांची हत्या आणि सोनिया यांची राजकारणात एन्ट्री

राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अवघ्या सात वर्षांत 21 मे 1991 रोजी त्यांची हत्या करण्यात (Assassination of Rajiv Gandhi) आली. राजीव गांधी यांच्या निधनानंतर सोनिया गांधी राजकारणापासून भावनिकदृष्ट्या दूर होत्या. मात्र त्या राजकारणापासून फार काळ दूर राहू शकल्या नाहीत अखेर, 1997 मध्ये त्यांनी काँग्रेसची धुरा हाती घेतली आणि एका वर्षानंतर त्या काँग्रेसच्या प्रमुख झाल्या.

Sonia Gandhi Life Journey | Sonia Gandhi Birthday| Congress Politician Sonia Gandhi
Rajasthan: लग्नाची वरात निघणार एवढ्यात; पाच सिलेंडरचा स्फोट, नवऱ्यामुलासह 60 जण जखमी, चौघांचा मृत्यू

सलग दहा वर्षे आघाडी सरकारचे नेतृत्व केले

2004 च्या निवडणुकीनंतर सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने आघाडी सरकार स्थापन करण्यात आले. तेव्हापासून त्यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीवर (UPA) वर्चस्व गाजवले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली यूपीएने 2009 मध्ये पुन्हा एकदा सत्ता मिळवली. युतीचं सरकार सलग दहा वर्षे सत्तेत राहिले. सोनिया गांधी 2004 मध्येच देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकल्या असत्या पण, त्यांनी देशाचे सर्वोच्च पद नाकारले.

दीर्घकाळ काँग्रेसचे नेतृत्व

नरेंद्र मोदी लाटेत 2014 मध्ये यूपीए सरकार मागे पडले आणि केंद्रात भाजपचे सरकार आले. यानंतर 2017 मध्ये सोनिया गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पण ऑगस्ट 2019 मध्ये त्यांनी पुन्हा पक्षाचे नेतृत्व स्वीकारले. त्यानंतर काहीकाळ त्यांचे पुत्र राहुल गांधी यांनी पक्षाचे नेतृत्व केले. सध्या मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत.

असे असले तरी आजही सोनिया गांधींचा पक्षातील प्रभाव कमी झालेला नाही. आजही त्यांना पक्षातील एक महत्वाच्या नेत्या मानल्या जातात. तसेच, त्यांना जगातील सर्वात प्रभावशाली किंवा शक्तिशाली महिला मानले जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com