एक ही नारा एक ही नाम, जय श्रीराम; पाकिस्तानची काश्मीरसंबंधी लाईव्ह झूम मिटींग हॅक

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

हॅकर्सनी झूम मिटींगच हॅक केल्याने मिटींगमध्ये राम आणि हनुमान या हिंदु देवतांवरची गाणी ऐकू येवू लागली. “आम्ही भारतीय आहोत, आम्ही तुम्हाला मारू”, असेही म्हणताना हे हॅकर्स आढळून आले आहेत.     

नवी दिल्ली- काश्मीर प्रश्नासंबंधी पाकिस्तानकडून फेसबूकवर झूम मिटींग आयोजित करण्यात आली होती. यात अनेक देशांचे तज्ञ सामील झाले होते. मात्र, हॅकर्सनी ही मिटींगच हॅक केल्याने मिटींगमध्ये राम आणि हनुमान या हिंदु देवतांवरची गाणी ऐकू येवू लागली. “आम्ही भारतीय आहोत, आम्ही तुम्हाला मारू”, असेही म्हणताना हे हॅकर्स आढळून आले आहेत.     

मंगळवारी, पाकिस्तानी मुत्सद्यांच्या एका चमुने, काही मानवाधिकार कार्यकर्ते व काही पाकिस्तान धार्जिण्यांनी ‘भारताच्या काश्मीर व्यापाची ७२ वर्षे’ या विषयावर एक ऑनलाईन झूम मिटींग घेतली होती. यात पाकिस्तान धार्जिणे विचारवंत सी जे वर्लमॅन हे काश्मिरमधील कथित भारतीय अत्याचार या विषयावर बोलण्यासाठी सहभागी झाले होते. 

ही भारतविरोधी विषयावरील मिटींग सुरू असताना काही भारतधार्जिण्यांनी ही मिटींग हॅक करून पाकिस्तानी मुत्सद्यांना काश्मीर विषयावर खोटे बोलण्यापासून रोखण्यासाठी मनसूबे बांधल्याने इतर अकाऊंट्सवरून ते जॉईन झाले. या भारताच्या युजरने मिटींगमध्ये अवैधरित्या जॉईन झाल्यानंतर काही हिंदू राष्ट्रभक्तीची गाणी लावून पाकिस्तान्यांच्या भारतविरोधी आवाजाला दाबण्याचा प्रयत्न केला. अचानक सुरू झालेले गाणे पाकिस्तानी मुत्सद्यांना शांत करण्यासाठी दोन मिनिटांसाठी सुरूच ठेवण्यात आले होते.  
 

संबंधित बातम्या