कमांडो राकेश्वर सिंग यांच्या सुटकेसाठी नागरिक रस्त्यावर; जम्मू-अखनूर हायवेवर रास्तारोको

दैनिक गोमंतक
बुधवार, 7 एप्रिल 2021

सीआरपीएफचे जवान राकेश्वर सिंग मनहास यांना नक्षलवाद्यांनी ओलीस ठेवले असल्याची माहिती मिळते आहे. राकेश्वर सिंग मनहास यांच्या सुटकेसाठी जम्मू- काश्मीर मधील त्यांच्या निवासस्थानाच्या परिसरातील लोक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरल्याचे समजते आहे.

जम्मू-काश्मीर: शनिवारी 3 एप्रिल रोजी छत्तीसगडच्या बीजापूर गावाजवळ असलेल्या भागात नक्षलवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर हल्ला केला होता. यावेळी जवानांनी देखील प्रत्युत्तरादाखल कारवाई केली आणि या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 22 जवान शहीद झाले असून 32 जवान जखमी झाले आहेत. मात्र याच घटनेत सीआरपीएफचा एक जवान बेपत्ता असल्याचे समजते आहे. या जवानाच्या सुटकेची मागणी करत जम्मू काश्मीर मध्ये स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. (locals block Jammu-Akhnoor highway demanding the release of CRPF jawan Rakeshwar Singh)

नक्षलवाद्यांचा पत्रकाराला फोन; म्हणाले, "जवानाला लवकरच सोडू"

छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये झालेल्या या हल्ल्यात नक्षलवादी आणि सीआरपीएफ जवानांमध्ये मोठी चकमक झाली होती. दुर्दैवाने या चकमकीत सीआरपीएफचे जवान शहीद झाले आहेत. याच घटनेत सीआरपीएफचे जवान राकेश्वर सिंग मनहास यांना नक्षलवाद्यांनी ओलीस ठेवले असल्याची माहिती मिळते आहे. राकेश्वर सिंग मनहास यांच्या सुटकेसाठी जम्मू- काश्मीर मधील त्यांच्या निवासस्थानाच्या परिसरातील लोक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरल्याचे समजते आहे. जवानाच्या सुटकेची मागणी घेऊन रस्त्यावर उतरलेल्या या नागरिकांनी जम्मू ते अखनूर जाणारा हायवे बंद (Jammu Akhnoor Highway) करण्यात आल्याची माहिती मिळते आहे.  

 
यापूर्वी कोब्रा कमांडो राकेश्वर सिंग मनहास (Rakeshwar Singh Manhas) यांच्या 5 वर्षांची मुलगी श्रगवीने 'कृपया माझ्या वडिलांना सोडा' अशी विनंती केल्याचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. शनिवारी झालेल्या प्राणघातक हल्ल्याची बातमी समजताच कमांडो राकेश्वरसिंग मनहास यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला होता. नक्षलवाद्यांनी हल्ल्यानंतर (Naxal Attack) मनहास यांचे अपहरण केले आहे. 

संबंधित बातम्या