लॉकडाऊनची भीती: कामगारंच्या राष्ट्रीय महामार्गावर रांगा

लॉकडाऊनची भीती: कामगारंच्या राष्ट्रीय महामार्गावर रांगा
Lockdown Migration of workers is likely to affect industries

नवी दिल्ली: कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असतांना अनेक ठिकाणी नाईट कर्फ्यू आणि लॉकडाउन सुरू झाले आहेत, तेव्हा भीतीमुळे कामगार घरी परत जायला निघाले आहेत. गेल्या वर्षी लॉकडाउनमुळे स्थलांतरित मजुरांचे प्रचंड हाल झाले. हा त्रास टाळण्यासाठी स्थलांतरितांनी आधीच स्थलांतर करण्यास सुरवात केली आहे. घरी परत जाणाऱ्यांची राष्ट्रीय महामार्गावर लाईन लागली आहे. त्याचबरोबर बसमधून जाणाऱ्यांचीही एकच झूंबड उडाली आहे.

कामगारांच्या स्थलांतरामुळे उद्योगधंदयांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आले तेव्हा अचानक वाहतूक थांबल्यामुळे स्थलांतरित मजुरांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागला. जेव्हा मजुरांना जेवणाची समस्या उद्भवली, शेकडो किलोमीटर मजूर घरी उपाशापोटी पायी चालत निघाले. कसे तरी पायी चालत हे मजूर घरी पोहचले. लॉकॉडाउन शिथिल झाल्यानंतर जस जसे कारखाने उद्योगधंदे सुरू झाले तस तसे कामगार परत येवू लागले, आता कामगार खूप प्रयत्न करून परत आले आहे. पण पुन्हा एकदा कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जात आहे. म्हणून लॉकडाऊनच्या भीतीने प्रवासी मजूर पळून जाऊ लागले आहेत. राष्ट्रीय महामार्गावर, कामगारांच्या रांगा बघायला मिळत आहे. स्टेशनवर र्गदी बघायला मिळत आहे.

खासगी ट्रॅव्हल्स सकाळी व संध्याकाळी उत्तर प्रदेश, बिहार अशा राज्यातून उद्योगधंदे असणाऱ्या राज्यांमध्ये बस पाठवत आहे आणि कामगार या बसेस ने घरी परत जात आहे. 

मजुरांच्या स्थलांतरामुळे उद्योजकांच्या अडचणी वाढल्या
मजुरांच्या स्थलांतरानंतर उद्योजकांचे प्रश्न वाढू लागले आहेत. कारण कारखाने आणि उद्योगधंदे सुरुवातीला कोरोनामुळे बंद झाले होता, पण परिस्थिती पुन्हा सामान्य होऊ लागली होती, म्हणून जवळपास सर्वच सुरू झाले होते. मात्र कोरनाच्या वाढत्या केसेस बघता कामगार आता पुन्हा घराकडे परतायला लागले आहे. उद्योजकांसाठी संकट उद्भवू शकते.

Related Stories

No stories found.