लॉकडाउनचा राग काढला देवावर!

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 3 एप्रिल 2021

दिल्लीच्या पाश्चिमपुरी भागात एक विचित्र घटना घडली आहे. जेथे एका तरूणाने मंदिरात ठेवलेल्या मूर्तींना लक्ष्य केले कारण लॉकडाऊन दरम्यान त्याचे काम थांबविण्यात आले होते आणि त्याला सर्व आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागला होता.

नवी दिल्ली: दिल्लीच्या पाश्चिमपुरी भागात एक विचित्र घटना घडली आहे. जेथे एका तरूणाने मंदिरात ठेवलेल्या मूर्तींना लक्ष्य केले कारण लॉकडाऊन दरम्यान त्याचे काम थांबविण्यात आले होते आणि त्याला सर्व आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 9 वाजताच्या सुमारास पश्चीमपुरीतील माता वैष्णो मंदिराचे पुजारी राम पाठक मंदिरात आले आणि त्यांनी पाहिले की मंदिराच्या मोकळ्या भागात ठेवलेल्या भगवान शिवच्या दोन मूर्ती त्यांच्या ठिकाणी नव्हत्या. 

त्याशिवाय इतर काही मूर्तींचे नुकसान झाल्याचे दिसून आले. मंदिराच्या अंगणात विटा आणि दगड विखुरलेले होते. पुजारी यांनी पोलिसांना ही माहिती दिली. राम पाठक यांच्या म्हणण्यानुसार  रात्री ते मंदिरातून बाहेर पडले तेव्हा सर्व गोष्टी व्यवस्थित होत्या. 

बंगाल: निवडणुकीच्या कट्टर वातावरणात मोदी आणि ममता मिठाईचा गोडवा 

पुजारीच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि या घटनेत 28 वर्षीय विकीचा हात असल्याचे आढळले. पोलिसांनी त्याला कस्टडीत घेवून विचारपूस केली असता आरोपीने सांगितले की, लॉकडाऊन होण्यापूर्वी त्याचे रद्दीचे काम थांबले होते, तेव्हा त्याने देवाला सांगितले होते की, तू मला भिकारी करशील. तर मी त्याचा बदला नक्कीच घेइल, म्हणूनच मी मूर्तींचे नुकसान केले. 

पुलवामामध्ये भारतीय जवानांची धडक कारवाई; तीन दहशतवाद्यांचा खात्मा 

कोविडची परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी सरकारने सुमारे दोन महिने संपूर्ण लॉकडाउन लागू केले होते. त्याचा परिणाम दैनंदिन मजुरांवर झाला. लॉकडाऊन दरम्यान, लाखो मजुरांनी शेकडो मैलांचा प्रवास पूर्ण केला आणि त्यांच्या गावात परतले. हजारो लोकांना रस्त्यावर रहाण्यास भाग पडले गेले होते. आता पुन्हा एकदा परिस्थिती अनियंत्रित होत आहे, अशा परिस्थितीत दैनंदिन मजुरांच्या कपाळावर चिंतेच्या रेषा स्पष्ट दिसत आहेत. 

संबंधित बातम्या