लोकसभा: जावायांना मिळते त्या राज्यात जमिन; अर्थमंत्र्यांचं काँग्रेसला रोख ठोक प्रत्युत्तर

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 13 फेब्रुवारी 2021

"ज्या लोकांनी आमच्यावर क्रोनी सोबत व्यवहार केल्याचा आरोप केला आहे त्यांना मला हे उत्तर द्यायचे आहे की, स्वानिधी योजनेचे पैसे क्रोनी लोकांना जात नाही. जावायांना त्या राज्यात जमिन मिळते,

नवी दिल्ली: लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन चर्चा संत्रात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी भाषण केले. या चर्चासंत्रात बोलताना, कोरोना महामारी च्या काळात सरकारने प्रोत्साहनपर सुधारणाकार्य केले आहे. महामारीसारख्या आव्हानात्मक परिस्थितीमुळे या देशातील दीर्घकालीन विकास टिकवण्यासाठी आवश्यक असलेल्या सुधारणांचा निर्णय घेण्यापासून सरकारला कोणी रोखू शकत नाही. असे अर्थमंत्री म्हणाल्या.

पंतप्रधानांच्या अनुभवावंर आधारीत बजट

हे बजेट पंतप्रधानांच्या अनुभवाचे आहे. जेव्हा ते मुख्यमंत्री होते. 1991 नंतर लाइसेंसिंग व कोटा नियम संपुष्टात येत असताना बऱ्याच सुधारणा करण्यात आल्या आणि याच अनुभवाच्या आधारे या अर्थसंकल्पात सुधारणा केली गेली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत सांगितले की भारतीय उद्योजक, व्यवस्थापकीय, व्यवसाय, युवा जनसंघाच्या कलागुणांचा आम्ही आदर करतो. भाजपाचा नेहमीच भारतावर विश्वास आहे. आम्ही कुठूनही कर्ज घेतले नाही आणि हायब्रीड पण तयार केले नाही.

आरोग्यासाठी कमी पडणार नाही - अर्थमंत्री

अर्थमंत्री म्हणाल्या की, "या वेळी अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान मी स्पष्ट केले होते की आम्ही आरोग्याच्या आघाडीवर सर्वांगीण विचार करू. आम्ही प्रतिबंधात्मक आरोग्य, उपचारात्मक आरोग्य आणि निरोगीपणाकडे देखील लक्ष देत आहे. पाणी आणि स्वच्छताविषयक सुधारणेनंतर आरोग्यासाठी देण्यात आलेल्या वाटपात कोणतीही कपात होणार नाही, असे मी ठामपणे सांगू इच्छिते."

देवघर टू गोवा व्हाया महाराष्ट्र; रेल्वे मंत्र्यांकडून झारखंडला मोठ गिफ्ट -

जावायांना राज्यांमध्ये जमीन मिुळत होती...

"ज्या लोकांनी आमच्यावर क्रोनी सोबत व्यवहार केल्याचा आरोप केला आहे त्यांना मला हे उत्तर द्यायचे आहे की, स्वानिधी योजनेचे पैसे क्रोनी लोकांना जात नाही. जावायांना त्या राज्यात जमिन मिळते, जिथे काही पक्षांचे शासन चालत होते. राजस्थानात आणि हरियाना मध्ये असे व्हायचे." असे पंतप्रधान स्वाधीन योजनेबद्दल सांगतांना अर्थमंत्री म्हणाल्या. प्रधानमंत्री स्वानिधी योजनेंतर्गत आम्ही एका वर्षासाठी 50 लाख लघु व्यापाऱ्यांना दहा हजार रुपये दिले आहेत. हे कुणाचे क्रोनी नाही. आता हे क्रोनी कुठे आहे, ते त्या पक्षाच्या मागे दडलेले आहेत ज्यांना जनता नाकारत आहे. आमचे क्रोनी आमची जनता आहे,"असे प्रतिउत्तर त्यांनी विरोधकांच्या टिकेला दिले.

 

संबंधित बातम्या