लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना कोरोनाची लागण 

दैनिक गोमन्तक
रविवार, 21 मार्च 2021

लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे.

लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. ओम बिर्ला यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे त्यांना एम्स मध्ये भरती करण्यात आल्याचे समजते. एम्सने रुग्णालयाने आज याबाबत अधिकृतपणे निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार 19 मार्च रोजी ओम बिर्ला यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आणि 20 मार्च रोजी ओम बिर्ला यांना एम्सच्या कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. शिवाय, याक्षणी ओम बिर्ला यांची प्रकृती चांगली असल्याचे एम्सने आपल्या निवेदनात म्हटले आहे. 

संसदेचे पावसाळी अधिवेशन चालू असतानाच 58 वर्षांचे असलेले लोकसभेचे सभापती ओम बिर्ला कोरोनाने बाधित असल्याचे आढळले आहे. अर्थसंकल्पीय सत्राचा दुसरा टप्पा 8 मार्चपासून सुरू झाला आणि 8 एप्रिलपर्यंत चालणार आहे. मागील काही दिवसांपासून देशातील कोरोनाची नवी प्रकरणे पुन्हा वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काल एका दिवसात 43,846 कोरोनाची नवी प्रकरणे देशात आढळून आली आहेत. त्याच वेळी 197 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत देशात 1,15,99,130 ​​कोरोनाची प्रकरणे नोंदली गेली आहेत. व सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा 3,09,087 वर पोहचला आहे. यापूर्वी, मागील वर्षाच्या 26 नोव्हेंबर रोजी एकाच दिवसात कोरोनाची 44,489 प्रकरणे नोंदली गेली होती.    

दशकांपासून ईशान्येकडे दुर्लक्ष केल्याचे म्हणत नरेंद्र मोदी यांचे काँग्रेसवर...

दरम्यान, महाराष्ट्रातील मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. आदित्य ठाकरे यांनी काल कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आल्यानंतर कोरोनाची चाचणी केल्याचे सांगितले. व या चाचणीचा अहवाल सकारात्मक आल्याचे नमूद करत आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असे आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या ट्विटरवर म्हटले होते.   

संबंधित बातम्या