''लव्ह जिहाद: आयएसआयएस हिंदू आणि ख्रिश्चन समाजातील मुलींना जास्त लक्ष्य करतात''

दैनिक गोमंतक
बुधवार, 31 मार्च 2021

भाजपाने केरळमध्ये देखील जोरदार प्रचाराला सुरवात केली आहे. अशातच एका प्रचारसभे दरम्यान केरळ भारतीय जनता पक्षाचे प्रमुख के. सुरेंद्रन यांनी पुन्हा एकदा 'लव्ह जिहाद'चा मुद्दा उपस्थित केला आहे.

केरळ : देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून प्रचारसभांना जोर आला आहे. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, पुददूचेरी आणि आसाममध्ये निवडणुकांच्या प्रचारसभांच्या तोफा धडाडू लागल्या आहेत.  भाजपाने केरळमध्ये देखील जोरदार प्रचाराला सुरवात केली आहे. अशातच एका प्रचारसभे दरम्यान केरळचे  भारतीय जनता पक्षाचे प्रमुख के. सुरेंद्रन यांनी पुन्हा एकदा 'लव्ह जिहाद'चा मुद्दा उपस्थित केला आहे. जागतिक दहशतवादी गट आयएसआयएस (इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया)  हिंदू आणि ख्रिश्चन समाजातील मुलींना लक्ष्य करत असल्याचे विधान के सुरेंद्रन यांनी केले आहे. (Love Jihad: ISIS targets girls in Hindu and Christian communities) 

Video: चहलच्या बायकोचा 'भांगडा' होतोय व्हायरल

के. सुरेंद्रन यांनी लव्ह जिहादच्या मुद्दयावर भाष्य करताना, राज्यात लव्ह जिहाद एक सत्य असल्याचे म्हटले आहे. आयएसआयएस हिंदू-ख्रिश्चन मुलीनांच जास्त लक्ष्य करत आहे. विशेष म्हणजे विद्यार्थिनींना जास्त लक्ष्य केले जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच, लव्ह जिहाद नसेल तर ते जोडप्यांना सिरियाला का पाठवत आहेत, असा सवालही त्यांनी यावेळी विचारला. त्यामुळे आपण सत्तेत आल्यावर लव्ह जिहाद विरोधात कायदे करू, अशी घोषणा आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात केली असल्याचे यावेळी के. सुरेंद्रन यांनी स्पष्ट  केले.  इतकेच नव्हे तर, दक्षिणेकडील राज्यात 'लव्ह जिहाद' हा एक गंभीर मुद्दा आहे, असे केवळ केरळमधील फक्त हिंदूनाच नव्हे तर ख्रिश्चन समाजालाही असे वाटते.  असेही त्यांनी यावेळी नमूद केले. 

दरम्यान, केरळमधील विधानसभा निवडणुका 6 एप्रिल रोजी होणार असून एकाच टप्प्यात होणार आहे. तर 2 मे रोजी केरळ निवडणुकांचा निकाल जाहीर होईल.  मागील वर्षी डिसेंबरमध्ये, भाजपाप्रणित मध्य प्देशच्या मंत्रिमंडळाने स्वातंत्र्य विधेयक 2020 ला मंजुरी दिली होती. यात  मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत लव्ह जिहाद बाबात कायदा करण्यात आला.  तर उत्तर प्रदेशातही असाच कायदा आहे.

तथापि, यावर्षी 4 फेब्रुवारी रोजी गृह मंत्रालयाने याबाबत एक निवेदन जारी केले आहे. यानुसार, विद्यमान कायद्यांनुसार 'लव्ह जिहाद' या शब्दाची व्याख्या कुठेही करण्यात आलेली नाही. आणि आतापर्यंत अशा प्रकारची कोणतीही घटना घडलेली नाही. मध्यवर्ती एजन्सींकडून अद्याप अशा कोणत्याही प्रकारची नोंद झाली नाही. तथापि, केरळमधील आंतर-विश्वासविवाहित दोन प्रकरणांची चौकशी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) केली आहे, असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे.

संबंधित बातम्या