उत्तरप्रदेशात लव्ह जिहाद: 'कुटुंबियांनीचं केली हिंदू महिलेची हत्या'

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021

एका हिंदू महिलेने मुस्लिम व्यक्तीबरोबर प्रेमसंबंध ठेवल्याने महिलेच्या कुटुबीयांनीच तिला जिंवत जाळलं.

लखनऊ : उत्तरप्रदेश राज्यात योगी सरकारने लव्ह जिहाद सारखा कायदा करुन धार्मिक विवाहाला रोख लावला आहे. मात्र उत्तरप्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका हिंदू महिलेने मुस्लिम व्यक्तीबरोबर प्रेमसंबंध ठेवल्याने  महिलेच्या कुटुबीयांनी तिला  जिंवत झाळलं आहे. पूर्व उत्तरप्रदेशातील संत कबीर जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. मृत झालेल्या महिलेच्या कुटुबांतील वडिल, भाऊ, आणि दोन नातेवाईकांना उत्तरप्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी या महिलेला मारण्यासाठी सुपारी दिली आसल्य़ाचे पोलिसांनी यावेळी सांगितले आहे. तसेच महिलेच्या कुटुबांतील सदस्यांनी हत्या केली आसल्याची कबुली दिली आहे असेही पोलिसांनी यावेळी म्हटले आहे.

उत्तरप्रदेश पोलिस आता हत्या करण्यासाठी सुपारी दिलेल्या भाडोत्री मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. 28 वर्षीय तरुणीची हत्या करण्यासाठी ही सुपारी देण्यात आली होती. 4 फेब्रुवारीच्या रात्री या तरुणीचा मृतदेह जळलेल्या अवस्थेत सापडला. मात्र या तरुणीला 3 फेब्रुवारीच्या दिवशी  जाळण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.

मध्य प्रदेशात भीषण अपघात; बस कालव्यात पडून 39 प्रवाशांचा मृत्यू

तसेच मृत महिलेच्या नातेवाईकांना अटक करण्यात आली. महिलेचे वडिल लष्करात होते. विवाहीत मुस्लिम पुरुषाबरोबर या महिलेचे प्रेमसंबंध होते. एखदा ती त्याच्य़ाबरोबर निघूनही गेली होती. परंतु ती नंतर काही दिवसांनी परत आली होती. या प्रेमसंबंधाला आमचा आक्षेप असतानाही त्या पुरुषाबरोबर तिने प्रेमसंबंध ठेवले असल्याची कबुली मृत महिलेच्या वडिलांनी पोलिसांच्या चौकशी दरम्यान दिली आहे. धानघाटा पोलिस ठाण्याच्या परिसरातील जिगीना गावात चार फेब्रुवारीच्या दिवशी सर्वप्रथम मृत महिलेचा अर्धवट अवस्थेत जळलेला मृतदेह सापडला होता. या महिलेची ओळख पटवून हत्या केलेल्या गुन्हेगारांना शोधण्यासाठी उत्तरप्रदेश पोलिसांनी विशेष पथकही तयार केले होते.
 

संबंधित बातम्या