गृहिणींचे बजेट ढासळणार; एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ

गृहिणींचे बजेट ढासळणार; एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ
LPG gas cylinder prices have gone up

नवी दिल्ली: आज सरकारी तेल कंपन्यांनी सर्वसामान्यांना मोठा धक्का दिला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याबरोबरच तेल कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीही वाढवल्या आहेत. तेल कंपन्या दरमहा एलपीजी सिलिंडरच्या किंमतींचा आढावा घेतात. हा कर प्रत्येक राज्यात वेगवेगळा असतो आणि त्यानुसार एलपीजीची किंमत बदलते. आजपासून, आपल्याला 14.2 किलो विना अनुदानित एलपीजी सिलिंडरची जास्त किंमत मोजावी लागणार आहे. मात्र, 19 किलो सिलिंडरच्या किंमत खाली आल्या आहेत. 

14.2 किलो सिलिंडर इतका महाग झाला

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) वेबसाइटच्या माहितीनुसार, 14.2 किलो विना अनुदानित एलपीजी सिलिंडर 25 रुपयांनी महागला आहे. दिल्ली आणि मुंबईतील 694 रुपयांवरून आता 719 रुपयांवर गेला आहे. कोलकाता येथे त्याची किंमत 720.50 रुपये होती, ती आता 745.50 रुपये झाली आहे. आणि चेन्नईमध्ये ती किंमत 710 रुपयांवरून 735 रुपयांवर गेली आहे. यापूर्वी 15 डिसेंबर रोजी  सिलिंडरचे दर 50 रुपयांनी वाढविण्यात आले होते. 

19 किलो सिलिंडरच्या किंमतीत कपात

19 किलो गॅस सिलिंडरची किंमत सहा रुपयांनी कमी झाली आहे. देशाची राजधानी दिल्लीत हे दर 1539 रुपयांवरुन 1533 रुपयांवर आले आहे. कोलकातामध्ये त्याची किंमत 5.5 रुपयांनी कमी करण्यात आली आहे, त्यानंतर 1604 रुपयांवरून 1598.50 रुपये करण्यात आली आहे. मुंबई आणि चेन्नईमध्येही 5.5 रुपयांनी स्वस्त झाले आहे आणि अनुक्रमे 1482.50 1649 झाले आहेत.

गॅस सिलिंडर्सवर सरकार याप्रमाणे देते अनुदान 

सध्या सरकार एका वर्षात प्रत्येक घरासाठी 14.2 किलोच्या 12 सिलिंडर्सवर अनुदान देते. ग्राहकांना यापेक्षा जास्त सिलिंडर घ्यायचे असतील तर ते बाजारभावाने खरेदी करतात. गॅस सिलिंडरच्या किंमत दरमहा बदलत जाते. 

अशा प्रकारे तपासू शकता एलपीजी किंमती

एलपीजी सिलिंडरची किंमत तपासण्यासाठी तुम्हाला सरकारी तेल कंपनीच्या वेबसाईटवर जावे लागेल. या कंपन्या दरमहा नवीन दर जाहीर करत असतात.(https://iocl.com/Products/IndaneGas.aspx)या संकेतस्थळावर आपण आपल्या शहर गॅस सिलिंडरची किंमत तपासू शकता.

आज डिझेलच्या किंमती 35 वरुन 37 पैशांनी वाढल्या आहेत, तर पेट्रोलच्या किंमतीही 35 वरून 34 पैशांवर पोहचल्या आहेत. दिल्ली आणि मुंबईमध्ये पेट्रोलचे दर कायमचे उच्चांक गाठले आहेत.

          शहर           डिझेल      पेट्रोल

  • दिल्ली          76.83      86.65
  • कोलकाता    80.41      88.01
  • मुंबई            83.67      93.20
  • चेन्नई            82.04      89.13
  • इंदोर           84.93      94.62
No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com