एलपीजी गॅस किमत 1 जून पासून वाढण्याची शक्यता

गॅस दरावरुन केंद्र आणि विरोधी पक्षात खडाजंगी ?
Gas cylinder
Gas cylinderDainik Gomantak

देशात दिवसेंदिवस रुपयाची घसरण होत आहे. वाढत असलेली महागाई या मुद्यांवरुन विरोधी पक्ष केंद्र सरकारवर टीका करत आहेत. या मुद्यावरुन केंद्र सरकारला विरोधी पक्षांकडून घेरलं जात असताना पुन्हा एलपीजीच्या किमती वाढण्याच्या शक्यतेवरुन केंद्र सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात खडाजंगी जुंफण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण देशात पुन्हा एकदा 1 जून रोजी एलपीजीच्या किमती वाढू शकतात. गॅस कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला दर निश्चित करतात. यावेळी घरगुती एलपीजीची किंमत 1100 रुपयांच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे. (LPG prices likely to rise from June 1)

Gas cylinder
गायक मूसवाला हत्येप्रकरणी पंजाब पोलिसांची जलद कारवाई; उत्तराखंडमधून सहा जणांना घेतले ताब्यात

गॅसची किंमत वाढण्याचे महत्त्वाचं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसची किंमत. मात्र, डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर होणे हे एक कारण आहे. वास्तविक, ही खरेदी आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरवर होते आणि रुपया कमकुवत झाल्यामुळे भारताला जास्त किंमत मोजावी लागते. याशिवाय सध्या गॅसचा पुरवठा त्याची मागणी पूर्ण करू शकत नाही. गॅसचे दर वाढण्यामागे हेही एक कारण आहे.

गॅस कंपन्यांनी मे महिन्यात घरगुती एलपीजीच्या दरात दोनदा वाढ केली होती. पहिला दर 7 मे रोजी वाढवण्यात आला होता. या दिवशी 14.2 किलोच्या सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर 19 मे रोजी पुन्हा साडेतीन रुपयांची वाढ करण्यात आली. म्हणजेच 1 महिन्यात एलपीजीवर एकूण 53.5 रुपयांची वाढ करण्यात आली. जागतिक बाजारपेठेतील गॅसच्या किमती पाहता 1 जून रोजी पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.

व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ

1 मे रोजी 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती. दिल्लीत त्याची किंमत 102 रुपयांनी वाढली आहे. यानंतर राजधानीत व्यावसायिक सिलिंडरची किंमत 2355.5 रुपये झाली. त्याच वेळी, 5 किलोच्या लहान एलपीजी सिलेंडरची किंमत 655 रुपये करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com