एम. के. स्टॅलिन तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री; मंत्रिमंडळात अनुभवी नेत्यांसह नव्या चेहऱ्यांना संधी

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 7 मे 2021

गेल्या महिन्यात झालेल्या तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत (Tamilnadu Assembly Election) बहुमताने विजयी झाल्यानंतर  द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन (M.K.Stalin) यांनी बुधवारी   मुख्यमंत्रीपदाची शपथ (CM oath) घेतली.  

 चेन्नई : गेल्या महिन्यात झालेल्या तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत (Tamilnadu Assembly Election) बहुमताने विजयी झाल्यानंतर  द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन (M.K.Stalin) यांनी बुधवारी   मुख्यमंत्रीपदाची शपथ (CM oath) घेतली.  राज्यपाल बनवारीलाल पुरोहित (Banwarilal Purohit) यांनी एम. के. स्टॅलिन यांना  मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजभवनात अगदी साध्या पद्धतीने  एम. के. स्टॅलिन यांचा शपथविधी पार पडला. विशेष बाब म्हणजे,  तब्बल दहा वर्षांनंतर द्रमुक पक्ष सत्तेवर आला आहे.  यापूर्वी  2006-2011 या काळात  द्रमुक सरकार सत्तेत होते. यावेळी  एम. के. स्टॅलिन हे उपमुख्यमंत्री होते आणि त्यांचे वडील एम करुणानिधी मुख्यमंत्री पदावर  होते.  (M. K. Stalin the new Chief Minister of Tamil Nadu) 

न्यायालयाने गोवा सरकारला दिलेले 10 आदेश 

दरम्यान, स्टॅलिन यांनी  नव्याने निवडून आलेल्या द्रमुकच्‍या १३३ आमदारांची यादी राज्यपाल बनवारी लाल पुरोहित यांच्याकडे सादर करत सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानंतर राज्यपालांनी त्यांना नवे सरकार स्थापन करण्यासाठी  निमंत्रण दिले.  तथापि, एम. के. स्टॅलिन यांच्या मंत्रिमंडळात अनुभवी आणि ज्येष्ठ नेते दुराईमुरुगन यांच्या व्यतिरिक्त सुमारे 12 नवीन सदस्य पहिल्यांदाच मंत्रिपदी विराजमान होणार आहेत. एम. के.  स्टॅलिन यांनी आपल्या  मंत्रिमंडळात अनेक माजी मंत्री म्हणून काम केलेल्या अनुभवी ज्येष्ठ नेत्यांचा समावेश केला आहे. तसेच, काही नवीन चेहऱ्यांनादेखील संधि दिली आहे. मात्र, मंत्र्यांच्या यादीमध्ये फक्त दोन महिलांचा समावेश आहे.  यात आर सखापानी, पी. मूर्ती, आर. गांधी,  पी.के. सेकर बाबू, एस.एम. नसर, चेन्नईचे माजी महापौर सुब्रमण्यम, नबिल महेश मोय्यामोजी, शिव व्ही मयनाथन,  एस.एस. शिवशंकर, पलानीवेल त्यागराजन, अनबिल महेश मोय्यामोजी,  टी मनो थांगराज,  शिव व्ही मयनाथन, सी.व्ही. गणेशन यांचा समावेश आहे. 

Goa Lockdown: गोवा सरकारची लॉकडाउनसाठी सकारात्मक भूमिका

तसेच, आजपासून तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के.  स्टॅलिन मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारतील. गृह खत्यासाह  सार्वजनिक व सामान्य प्रशासन, जिल्हा महसूल अधिकारी, विशेष कार्यक्रम अंमलबजावणी व दिव्यांग कल्याण विभाग यांच्यासह अखिल भारतीय सेवा या खात्याचा ते कारभार सांभाळणार आहेत.  तर, पक्षाचे सरचिटणीस दुरईमुरुगन जलसंपदा मंत्री पदाचा कारभार सांभाळतील. द्रमुक सरकारमध्ये दुरईमुरुगन 2006 ते 2011 या काळात  सार्वजनिक बांधकाम मंत्री होते.  

संबंधित बातम्या