मध्यप्रदेशात आकर्षक मियाझाकी आंब्यांनी खाल्ला लाखांचा भाव

मध्यप्रदेशात आकर्षक मियाझाकी आंब्यांनी खाल्ला लाखांचा भाव
In Madhya Pradesh, attractive Miyazaki mangoes cost millions

मध्यप्रदेश : मियाझाकी आंबे (Miyazaki Mango) जगातील (world) सर्वात महागडे आंबे (Mango) म्हणून ओळखले जातात. या आंब्यांना गेल्यावर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात २.७० लाख पर किलोला (KG) इतका भाव मिळाला आहेत. मियाझाकी आंबे अँटीऑक्साइडमध्ये (Antioxidants) असून, त्यात बीटा कॅरोटीन (Beta carotene) आणि फॉलिक अॅसिड असते. हे आंबे दिसण्यास खूप आकर्षक असतात. मध्य प्रदेशातील एका जोडप्याने आपल्या फळबागेत हे आंब्यांची कलमे लाऊन त्याची चोरी रोखण्यासाठी चक्क कुत्री तैनात केली आहेत. (In Madhya Pradesh, attractive Miyazaki mangoes cost millions)

राणी आणि संकल्प परिहार या दामपत्यांनी आपल्या फळबागेत दोन आंब्याची झाडे लावली होती. त्यांना थोडीही कल्पना नव्हती त्यांनी लावलेली रुबी कलर मँगो ही झाडे जापानी मेयाझाकी प्रजातीची झाडे आहेत. ही प्रजाती जगातील सर्वात महागडी प्रजाती म्हणून ओळखली जाते. या आंब्यांना गेल्यावर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात २.७० लाख रुपये किलो इतका भाव मिळाल्याचे जापानमधील माध्यमातून समोर आले आहे. मागीलवर्षी या दामपत्यांच्या फळबागेतून या आंब्यांची चोरी झाली होती. त्यामुळे या झाडांचे रक्षण करण्यासाठी या जोडप्यांनी ४ रक्षक आणि ६ कुत्री ठेवली आहेत. याबाबत माहितीदेताना परिहार दांमपत्य म्हणाले, आम्ही चेन्नईला जात असताना रेल्वेत आम्हाला एक माणूस भेटला. त्याच्याकडून आम्हाला या प्रजातीच्या रोपांबाबत माहिती मिळाली. त्याने आम्हाला या प्रजातीची दोन रोपे दिली, त्या रोपांची आम्ही आमच्या मुलाप्रमाणे काळजी घेतली. त्यावेळी हा आंब्याचा कोणता प्रकार आहे, याबाबत आम्हाला माहिती देखील नव्हती.

या आंब्यांच्या प्रजातीला आम्ही माझ्या आईचे दमिनी हे नाव दिले. त्यावेळी आम्हाला या प्रजातीच्या नावाबाबत काहीच माहिती नव्हते. त्यानंतर आम्ही याचा शोध घेतल्यास याचे खरे नाव कळाले. परंतु माझ्यासाठी याचे नाव दामिनीच असेल. असे परिहार यांनी नमूद केले.   

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com