पतीने शिवले पत्नीचे गुप्तांग, तरीही गुन्हा दाखल न करण्याची पत्नीची पोलिसांना विनंती

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सिंगरौली (Singrauli) जिल्ह्यात एका व्यक्तीने आपल्या पत्नीचे गुप्तांग (Genitals) टाके घालून शिवले आहे
 Madhya Pradesh: Husband Sews Her Genitals but she said 'Don't Arrest Him'
Madhya Pradesh: Husband Sews Her Genitals but she said 'Don't Arrest Him'Dainik Gomantak

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सिंगरौली (Singrauli) जिल्ह्यात एका व्यक्तीने आपल्या पत्नीचे गुप्तांग (Genitals) टाके घालून शिवले आहे कारण त्याला संशय आला होता की ती आपली फसवणूक करत आहे. महिलेने मात्र पोलिसांना तिच्या पतीवर कोणतीही कठोर कारवाई करू नये अशी विनंती केली असूनही तिला मात्र यातना सहन कराव्या लागत आहेत. (Husband Sews Her Genitals but she said 'Don't Arrest Him')

एका वृत्त वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, तिने पोलिसांना विनंती केली की तिने आपल्या पतीलाअसे पुन्हा करू नको हे सांगण्यासाठी फटकारावे. 'आरोपीचाय पत्नीने या प्रकरणाची तक्रार केल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सिंगरौलीचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिल सोनकर यांनी हा माणूस सध्या फरार असल्याचे सांगितले आहे .

 Madhya Pradesh: Husband Sews Her Genitals but she said 'Don't Arrest Him'
हातावरच्या टॅटूमुळे लागला खुनाचा तपास

या वर्षाच्या सुरुवातीला, आणखी एका भयानक घटनेत, उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीने तिच्या पत्नीचे गुप्तांग अॅल्युमिनियमच्या धाग्याने शिवले कारण त्यालाही तिच्या अवैध संबंधाबाबत शंका होती. ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या पतीने पत्नीला निष्ठा चाचणी घेण्यास सांगितल्यानंतर उत्तर प्रदेशच्या रामपूर जिल्ह्यातील मिलक परिसरात ही कथित घटना घडली होती.

ही चाचणी घेण्यास पत्नीच्या मान्यतेवर, पुरुषाने तिचे हात -पाय बांधले आणि तिचे गुप्तांग पूर्णपणे शिवले होते . आणि हा गुन्हा केल्यानंतर, तो माणूस परिसरातून पळून गेला होता. तिचा पती तिचा रक्तस्त्राव बघून तिला सोडून पळून गेल्यानंतर, 24 वर्षीय पत्नीने तिच्या आईशी संपर्क साधला जी नंतर पीडितेला सामुदायिक आरोग्य केंद्रात घेऊन गेली आणि तिच्या जावयाच्या विरोधात तक्रारही दाखल केली होती.

त्या प्रकरणात महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली ज्याने हल्ल्याची पुष्टी झाली होती. रामपूरचे पोलीस अधीक्षकयांनीही महिलेला गंभीर दुखापत झाल्याची पुष्टी केली आणि तिला योग्य उपचार दिले जातील असे आश्वासन दिले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com