म्हातारे होऊन मरणारच आहेत; कोरोना मृत्यूबाबत भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य

दैनिक गोमंतक
गुरुवार, 15 एप्रिल 2021

मध्यप्रदेशच्या सरकारमधील  मंत्री प्रेम सिंग पटेल यांनी वाढत्या मृत्यूदरा बद्दल मत व्यक्त करताना वादग्रस्त विधान केल्याचे समोर आले आहे. 

मध्यप्रदेश मध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत जाताना दिसते आहे. त्याच बरोबरीने राज्यातील मृत्यू दर देखील  आहे. मध्यप्रदेश सरकार मृत्यूचे आकडे लपवत असल्याचा आरोप देखील अनेकवेळा केला गेला असल्याचे पाहायला मिळाले होते. त्यातच मध्यप्रदेशच्या सरकारमधील  मंत्री प्रेम सिंग पटेल यांनी वाढत्या मृत्यूदरा बद्दल मत व्यक्त करताना वादग्रस्त विधान केल्याचे समोर आले आहे.  (Madhya Pradesh Minister And BJP leader's controversial statement about Corona's death )

"घरी परतणाऱ्या मजुरांकडून महाराष्ट्र पोलीस करता आहेत वसुली"

राज्यातील कोरोना रुग्णांची (Corona Patients) संख्या दिवसेंदिवस वाढत जात असल्याने परिस्थिती अधिक गंभीर होत जात असल्याचे पाहायला मिळते आहे. राज्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या देखील वाढताना दिसते आहे. याच विषयावर बोलताना मंत्री प्रेम सिंग पटेल (Prem Singh Patel) यांनी, लोकांच्या होणाऱ्या मृत्यूला कोणीही रोखू शकत नाही असे विधान केले आहे. एवढ्यावरच न थांबता लोक म्हातारे होत जात असल्याने त्यांना मरावेच लागत असते असेही ते पुढे म्हणाले. लोकांच्या मृत्यूला त्यांचे वाढते वयच कारण आहे असे सांगण्याचा प्रयत्न प्रेम सिंग यांनी केलेला पाहायला मिळाला.  

दरम्यान, माध्यमांमधून समोर आलेल्या काही घटनांमधून मध्यप्रदेश (Madhya Pradesh) सरकार कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे आकडे लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सुद्धा दिसून आले आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची सरकारने सांगितलेली आकडेवारी आणि स्मशानात अंत्यविधी साठी आलेल्या मृतदेहांची आकडेवारी यांच्यात मोठी तफावत असल्याचे दिसून आले होते. 

संबंधित बातम्या