'लव्ह जिहादविरुद्ध लवकरच नवीन कायदा करू'

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

कर्नाटक आणि हरियाणा या राज्यांनी असा कायदा करण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. पुढील अधिवेशनातच हे विधेयक सादर केले जाईल.

भोपाळ-  लव्ह जिहादविरुद्ध लवकरच कायदा करण्याची घोषणा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली आहे. या कायद्यांतर्गत अजामीनपात्र गुन्हे दाखल करून दोषींना पाच वर्षांपर्यंत कैद ठोठावण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे.

कर्नाटक आणि हरियाणा या राज्यांनी असा कायदा करण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. पुढील अधिवेशनातच हे विधेयक सादर केले जाईल. त्यानूसार, विवाहासाठी स्वेच्छेने धर्मांतर करायचे असल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे एक महिना आधी अर्ज करणे बंधनकारक असेल.

 

संबंधित बातम्या