Plane Crash: मंदीराच्या कळसाला धडकून विमानाचा अपघात

Plane Crash: या अपघातात एका पायलटचा दुर्देवी मृत्यू झाला आहे तर एक पायलट जखमी झाल्याची माहीती समोर आली आहे.
Plane Crash
Plane CrashDainik Gomantak

Plane Crash: मध्यप्रदेशातील रीवा येथे विमानाचा अपघात झाला आहे. या अपघातात एका पायलटचा दुर्देवी मृत्यू झाला आहे तर एक पायलट जखमी झाल्याची माहीती समोर आली आहे. महत्वाचे म्हणजे ,हा अपघात मंदीराच्या कळसाला विमान धडकल्याने झाला आहे.

पोलीसांनी याबाबतची माहिती देताना हे विमान प्रक्षिणार्थी असल्याचे सांगितले आहे. यात पायलट 54 वर्षांच्या कॅप्टन विमल कुमार यांचा मृत्यू झाला आहे. कॅप्टन विमल कुमार हे बिहारमधील पटना येथील रहिवासी होते.

मिळालेल्या माहितीनुसार, एका खासगी प्रशिक्षण कंपनीच्या या विमानाचा मंदिराचा कळस आणि वीजेच्या तारांना धडकून अपघात झाला. ही घटना चौरहाटा ठाण्याजवळील उमरी गावातील मंदिरानजीक घडली. अपघात झाल्यानतंर एका पायलटचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा पायलट गंभीर जखमी असल्याची माहीती मिळाली आहे.

Plane Crash
Delhi MCD: बुरखा घालून शांत बसलेल्या आप नगरसेविकेचा फोटो व्हायरल, का होतेय चर्चा

जखमी झालेल्या पायलटला संजय गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातात विमानाच्या पंखाचा चक्काचूर ज्याप्रकारे झाला आहे ,त्यावरुन हा अपघात किती मोठा होता हे दिसून येते. दरम्यान , हा अपघात प्रदुषित हवामानामुळे झाल्याचे म्हटले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com